26 April 2024 10:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Multibagger Stocks | या 5 मल्टिबॅगर शेअर्सनी 5 दिवसात 63 टक्केपर्यंत परतावा दिला, 5 मल्टिबॅगर स्टॉकची लिस्ट सेव्ह करा

Multibagger Stock

Multibagger Stocks | मागील बऱ्याच दिवसापासून शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकानी आपली सपोर्ट लेव्हल तोडली आहे. त्यामुळे शेअर बाजारात पुढील काळात आणखी पडझड पाहायला मिळेल. आज आयटी, पॉवर, आणि रियल्टी सेक्टरमधील स्टॉक विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. अमेरिकेतील ‘सिलिकॉन व्हॅली बँक’ आर्थिक संकटात सापडल्यामुळे भारतीय बँकिंग सेक्टरवरही दबाव पाहायला मिळत आहे. सध्या निफ्टी – 50 इंडेक्स 17000 च्या जवळ ट्रेड करत आहे, जर निफ्टीने ही पातळी तोडली तर शेअर बाजार आणखी खोलात जाऊ शकतो. अशाकाळात काही स्टॉक आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण अशाच काही शेअरबद्दल माहिती पाहणार आहोत.

ओरिसा बंगाल करिअर :
‘ओरिसा बंगाल कॅरियर’ या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 167.20 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात अवघ्या 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेरनी आपल्या गुंतवणूकदारांना 63.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या पाच दिवसात या कंपनीचे शेअर 48.62 रुपये किमतीवरून वाढून 79.46 रुपये किमतीवर पोहोचले आहे. आज मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी ‘ओरिसा बंगाल करिअर’ कंपनीचे शेअर 9.96% घसरणीसह 75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लोहिया सिक्युरिटीज :
‘लोहिया सिक्युरिटीज’ कंपनीने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या एका आठवड्यात कंपनीचे शेअर 213 रुपये किमतीवरून वाढून 336.65 रुपये किमतीवर पोहोचले आहे. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 58.05 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 167.75 कोटी रुपये आहे. मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी ‘लोहिया सिक्युरिटीज’ कंपनीचे शेअर पाच टक्के अप्पर सर्किट सह 388.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 51.79 टक्के परतावा कमावून दिला आहे.

कामधेनू व्हेंचर्स :
मागील एका आठवड्यात ‘कामधेनू व्हेंचर्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 40.08 टक्के परतावा कमावून दिला आहे. एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 149.45 रुपयांवरून वाढून 209.35 रुपयांवर पोहोचले आहेत. या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 568.20 कोटी रुपये आहे. मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी कामधेनु व्हेंचर्स कंपनीचे शेअर 2.56 टक्के घसरणीसह 195.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑब्जेक्ट वन इन्फॉर्मेशन :
ऑब्जेक्ट वन इन्फॉर्मेशन या कंपनीच्या शेअरने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावलेला आहे. मागील एका आठवड्यात या स्टॉकची किंमत 12.33 रुपयांवरून वाढून 16.88 रुपयांवर पोहोचली आहे. अवघ्या एका आठवड्यात लोकांनी या कंपनीच्या शेअरमधून 36.90 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 17.72 कोटी रुपये आहे. मंगळवार दिनांक 14 मार्च 2013 रोजी ऑब्जेक्ट वन इन्फॉर्मेशन कंपनीचे शेअर्स 4.72 टक्के घसरणीसह 15.73 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सिमॅक लिमिटेड :
‘सिमॅक लिमिटेड’ कंपनी मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 590.70 रुपयांवरून वाढून 803.45 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच या शेअरमधून गुंतवणूकदारांनी 36.02 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 2,042.77 कोटी रुपये आहे. मंगळवार दिनांक 14 मार्च 2019 रोजी या कंपनीचे शेअर 13 टक्के वाढीसह 833.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks for buying for short term to earn huge returns check details on 14 March 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x