
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स सोमवारी 1.5 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. तर आज हा बँकिंग स्टॉक किंचित तेजीसह वाढत आहे. नुकताच येस बँकेने सेबीला कळवले आहे की, बँकेच्या संचालक मंडळाची बैठक 27 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ( येस बँक अंश )
या बैठकीत मार्च 2024 तिमाहीच्या आर्थिक निकालांवर चर्चा केली जाणार आहे. 8 एप्रिल रोजी येस बँकेचे शेअर्स 1.59 टक्क्यांच्या घसरणीसह 24.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी येस बँकेचे शेअर 1.01 टक्के वाढीसह 25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2024 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत येस बँक स्टॉक 9.49 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 62.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. येस बँकेने 3 एप्रिल रोजी आपले मार्च तिमाहीतील कामगिरीचे आकडे जाहीर केले होते. मार्च 2024 च्या तिमाहीत येस बँकेच्या कर्जामध्ये 5 टक्के सुधारणा नोंदवली गेली आहे.
मार्च 2024 तिमाहीत येस बँकेचे कर्ज आणि अॅडव्हान्स 2.28 लाख कोटी रुपये होते. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेचे कर्ज आणि अॅडव्हान्स 2 लाख कोटी रुपये होते. बँकेच्या कर्ज आणि अॅडव्हान्समध्ये तिमाही दर तिमाही आधारावर 10 टक्के आणि वार्षिक आधारावर 22.5 टक्के नोंदवली गेली आहे. मार्च 2024 तिमाहीत येस बँकेत 2.66 लाख कोटी रुपये ठेवी होत्या.
या बँकेचा CASA वार्षिक आधारावर 23 टक्क्यांच्या वाढीसह 82,315 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत येस बँकेचा CASA 66,903 कोटी रुपये होता. मार्च 2017 तिमाहीत येस बँकेच्या मुदत ठेवींमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. मात्र ब्रोकरेज कंपन्यांनी स्टॉकबाबत फारशी उत्सुकता व्यक्त केलेली नाही.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.