12 May 2024 8:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Flipkart Big Diwali Sale | 10 हजार रुपयांच्या आत दिवाळीच्या ऑफरमध्ये मिळवा हे क्लासी स्मार्टफोन, धमाकेदार ऑफर

Flipkart Big Diwali Sale

Flipkart Big Diwali Sale | दिपावलीला सुरुवात झाली असून, दिपावली निमित्त मोठमोठ्या ऑनलाईन शॉपिंग सेंटरवर ऑफर्सचा हंगाम सुरु झाला आहे. दरम्यान, फ्लिपकार्टवर ‘बिग दिवाळी’ सेल सुरू झाला असून, हा सेल 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे आणि या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, इअरबड्स, स्मार्टवॉच आणि होम अप्लायन्सेससह अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणामध्ये सूट मिळणार आहे. तसेच ई-कॉमर्स वेबसाइटवरून, तुम्ही बंपर डिस्काउंट आणि सर्वोत्तम ऑफरवर स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे आणि त्याच वेळी, जर तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतींमध्ये मजबूत फीचर असलेला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे या सेलमध्ये अनेक उत्तम पर्याय आहेत तर चला आपण या ऑफर्सची माहिती घेऊयात.

दिवाळी निमित्त फ्लिपकार्टवर ‘बिग दिवाळी’ सेल सुरू
एवढेच नाही तर, बिग दिवाळी सेल अंतर्गत कंपनी SBI बँक कार्डने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 10 टक्के सूट देणार आहे तसेच आता आम्ही तुम्हाला अशा फोनबद्दल सांगणार आहोत, जो तुम्ही बिग दिवाळी सेलमधून 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतींत खरेदी करू शकणार आहात.

Poco C31 Poco
Poco च्या C31 Poco या फोनची किंमत 10,999 रुपये आहे तसेच सेलमध्ये, तुम्ही ते Rs 7,499 च्या किंमतीमध्ये हा फोन खरेदी करू शकणार आहात, शिवाय फ्लिपकार्ट यावर एक्सचेंज ऑफरही देणार ​​आहे. एक्सचेंज अंतर्गत, तुम्हाला फोनवर रु.6,950 पर्यंत अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसेच फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला 6.53 इंच HD+ डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी मिळणार आहे. त्याच वेळी, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा उपलब्ध आहे, तर सेल्फीसाठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

Samsung Galaxy F13
Samsung Galaxy F13 फोनची किंमत 14,999 रुपये आहे तर फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये, तुम्ही सर्व ऑफर्ससह हा फोन रु. 8,499 मध्ये खरेदी करू शकणार आहात आणि याशिवाय फोनवर एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे आणि फोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज आहे. डिव्हाइस 6.6-इंच फुल एचडी + डिस्प्लेसह सुसज्ज असणार आहे. फोनमध्ये 6000mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे तसेच फोटोग्राफीसाठी यामध्ये 50 मेगापिक्सल कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

Redmi
10 Redmi 10 ची किंमत 14,999 रुपये आहे तर सेलमध्ये उपलब्ध ऑफरसह, तुम्ही हा फोन 7,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्याच वेळी, एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनवर 8,400 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे आणि Redmi 10 मध्ये 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळत आहे. याशिवाय फोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी देखील मिळणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Flipkart Big Diwali Sale smartphone offers checks details 21 October 2022.

हॅशटॅग्स

#Flipkart Big Diwali Sale(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x