27 April 2024 4:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट
x

कर्नाटक: सत्तेसाठी चड्य्या, चादरी व उशा घेऊन भाजपा आमदारांचा विधानसभेतच मुक्काम

Karnataka, chief minister kumarswamy, B. S. Yeddyurappa, Siddaramaiah

बंगळुरू : कर्नाटक राज्यात आमदार फोडाफोडीच्या राजकारणाने कळस गाठल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्यांना सहज उपलब्ध नसणारे प्रतिनिधी आणि पंचतारांकित आयुष्य जगणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार सत्तेच्या लालसेपोटी विधानसभेत चड्य्या, चादरी व उशा घेऊन मुक्कामाला पोहोचले आहेत. भारतीय लोकशाही अक्षरशः टांगणीला लावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान गुरुवारी कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. परंतु यावरुन विधानसभेत गोंधळ झाल्याने कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आले. गुरुवारी काँग्रेस आणि जेडीएसचे पंधरा बंडखोर आमदार अनुपस्थित होते. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी विधानसभेतच ठिय्या दिला होता. उशा, चादरी घेऊन भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी कर्नाटक विधानसभेतच मुक्काम केला. आज सकाळी काही आमदार मॉर्निंग वॉकला देखील गेले होते.

दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत राज्यपालांनी दिली आहे. गुरुवारी संध्याकाळनंतर कर्नाटक विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे आमदार चादरी आणि उशा घेऊन दाखल झाले. तिथेच त्यांनी जेवणही केले आणि मुक्कामही केला. भारतीय जनता पक्षाचे आमदार चादरी आणि उशा घेऊन विधानसभेत पोहचले होते. आता आज कर्नाटक विधानसभेत काय महाभारत रंगणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हॅशटॅग्स

#karnatak Assembly Election 2018(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x