21 May 2024 8:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

PSU Stocks

PSU Stocks | संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या भारत डायनॅमिक्स या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स सात टक्क्यांनी वाढले आहेत. ब्रोकरेज फर्मने पुढील 30 दिवसांसाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( भारत डायनॅमिक्स कंपनी अंश )

ICICI डायरेक्ट फर्मने भारत डायनॅमिक्स स्टॉक 1795-1820 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या सरकारी कंपनीचे शेअर्स 1970 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज गुरूवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी भारत डायनॅमिक्स स्टॉक 0.38 टक्के घसरणीसह 1,839.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांनी भारत डायनॅमिक्स स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 1715 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळी 1985 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 901 रुपये होती.

मागील एका आठवड्यात भारत डायनॅमिक्स कंपनीचे शेअर्स 6.6 टक्के मजबूत झाले आहेत. तर मागील दोन आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 6.25 टक्के मजबूत झाले आहेत. मागील एका महिन्यात भारत डायनॅमिक्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 10 टक्के वाढली आहे. 14 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1552 रुपये नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्के नफा कमावून दिला आहे. आणि एका वर्षात या स्टॉकने गुंतवणुकदारांना 88 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत भारत डायनॅमिक्स स्टॉकने गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे.

भारत डायनॅमिक्स कंपनीला मोठ्या प्रमाणात निर्यात ऑर्डर मिळत आहेत. या कंपनीला इजिप्तमधून आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची ऑर्डर मिळाली आहे. इजिप्तमधून भारत डायनॅमिक्स कंपनीला 15 आकाश क्षेपणास्त्रे पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 5000-6000 कोटी रुपये असेल. या कराराची पूर्तता पुढील 4-5 वर्षांत करायची आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PSU Stocks Bharat Dynamics Share Price 18 April 2024.

हॅशटॅग्स

PSU Stocks(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x