18 May 2024 7:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?

KEI Share Price

KEI Share Price | केईआय इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. केईआय इंडस्ट्रीज ही कंपनी BSE 500 निर्देशांकात सामील असलेली कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः इमारत आणि बांधकाम, संरक्षण, दूरसंचार आणि इतर उद्योगांसाठी केबल्स आणि स्टेनलेस स्टील वायर्स बनवण्याचा व्यवसाय करते. ( केईआय इंडस्ट्रीज कंपनी अंश )

केईआय इंडस्ट्रीज ही कंपनी रिटेल आणि विविध उद्योगांसाठी उच्च व्होल्टेज, मध्यम व्होल्टेज आणि कमी व्होल्टेजच्या पॉवर केबल्स बनवण्याचे काम करते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4,117 रुपये या आपल्या नवीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी केईआय इंडस्ट्रीज स्टॉक 0.065 टक्के घसरणीसह 3,946.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

2014 मध्ये केईआय इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 4100 रुपये किमतीच्या पार गेले आहे. मागील 10 वर्षात केईआय इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27333 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 3 टक्के मजबूत झाले होते. तर मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात केईआय इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 120 टक्के वाढली आहे. मागील तीन वर्षांत केईआय इंडस्ट्रीज स्टॉक तब्बल 700 टक्के मजबूत झाला आहे.

केईआय इंडस्ट्रीज ही कंपनी भारतातील तिसरी सर्वात मोठी वायर आणि केबल्स कंपनी उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 35000 कोटी रुपये आहे. नवीन उत्पादनामुळे कंपनीला फायदा झाला असून कंपनीच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ नोंदवली गेली आहे. प्रीमियम उत्पादनांच्या विस्ताराचा फायदा कंपनीला झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KEI Industries Share Price NSE Live 25 April 2024.

हॅशटॅग्स

KEI Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x