
Sandur Manganese Share Price | संदूर मँगनीज अँड आयरन ओर्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारी विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. या कंपनीने शुक्रवारच्या व्यवहारात माहिती दिली की, कंपनीने Arjas Steel Pvt Ltd म्हणजेच ASPL कंपनीचे बहुसंख्य भाग भांडवल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही डील पूर्ण झाली की, संदूर मँगनीज अँड आयरन ओर्स ही कंपनी भारतातील टॉप 5 स्पेशॅलिटी स्टील उत्पादकांमध्ये सामील होईल. ( संदूर मँगनीज अँड आयरन ओर्स कंपनी अंश )
शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी संदूर मँगनीज अँड आयरन ओर्स कंपनीचे शेअर्स 4.25 टक्के घसरणीसह 521.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील एका महिन्यात संदूर मँगनीज अँड आयरन ओर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 43 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 17 टक्क्यांनी वाढले होते. गुरुवारी संदूर मँगनीज अँड आयरन ओर्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीने एएसपीएलसोबत भाग भांडवल खरेदी करण्याचा करार केला आहे. संदूर मँगनीज अँड आयरन ओर्स ही कंपनी ASPL मधील 80 टक्के भागभांडवल खरेदी करू शकते.
संदूर मँगनीज अँड आयरन ओर्स कंपनीची प्रवर्तक कंपनी असलेल्या BAG होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून देखील ASPL कंपनीचे 19 टक्के भागभांडवल खरेदी केले जाणार आहे. या खरेदी कराराची अंमलबजावणी झाली की, संदूर मँगनीज अँड आयरन ओर्स कंपनी पोलाद क्षेत्रात आणखी मजबूत स्थान निर्माण करेल. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ASPL कंपनीने 2876 कोटी रुपये कमाई केली होती. ASPL या कंपनीचे एकूण एंटरप्राइझ मूल्य 3000 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.