
Vesuvius Share Price | व्हेसुवियस इंडिया या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हेसुवियस इंडिया कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांच्या वाढीसह 5062.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी मार्च 2024 तिमाहीचे मजबूत निकाल जाहीर केल्याने पाहायला मिळाली आहे. ( व्हेसुवियस इंडिया कंपनी अंश )
मागील एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स तिप्पट वाढले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5084 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1613.05 रुपये होती. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी व्हेसुवियस इंडिया स्टॉक 2.88 टक्के वाढीसह 4,480 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
2 मे 2023 रोजी व्हेसुवियस इंडिया कंपनीचे शेअर्स 1642.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 30 एप्रिल 2024 रोजी हा स्टॉक 5062.10 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. व्हेसुवियस इंडिया ही कंपनी मुख्यतः सिरेमिक सिस्टीम बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी कास्टिंग प्रक्रियेत द्रव स्टीलचे नियंत्रण, संरक्षण आणि निरीक्षण करण्याचा व्यवसाय करते.
व्हेसुवियस इंडिया कंपनी पुढील काही वर्षात आपल्या व्यवसायात 1000 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. या कंपनीने नुकताच विशाखापट्टणममध्ये नवीन मोल्ड फ्लक्स मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचे उद्घाटन केले आहे. मार्च 2024 च्या तिमाहीत व्हेसुवियस इंडिया कंपनीने 68.8 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 59 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत कंपनीने 24 टक्के वाढीसह 453 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 366 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या कंपनीचे EBITDA मार्जिन 500 बेस पॉइंट्सने वाढून 20.8 टक्के नोंदवले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.