Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स मंगळवारी 5.5 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. मागील 5 दिवसांत येस बँकेचे शेअर्स 15 टक्क्यांनी घसरले आहेत. येस बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 30.75 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. ( येस बँक अंश )

येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 15.50 रुपये होती. आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 0.88 टक्के वाढीसह 23.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच येस बँकेने ब्राजीलस्थित दिग्गज पेमेंट कंपनी ‘Ebanx’ सोबत क्रॉस बॉर्डर मर्चेंट पेमेंटसाठी करार केला आहे. या कराराअंतर्गत येस बँकेचे भारतीय ग्राहक क्रॉस बॉर्डर मर्चेंट पेमेंटसाठी Ebanx सिस्टमचा वापर करू शकतात. मार्च 2024 तिमाहीत येस बँकेच्या निव्वळ नफ्यात 123 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. येस बँकेने शनिवार दिनांक 27 एप्रिल रोजी आपले आर्थिक वर्ष 2023-2024 च्या मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते.

मार्च 2024 तिमाहीत येस बँकेने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 123 टक्के वाढीसह 451 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत येस बँकेने 202 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2024 तिमाहीत येस बँकेने 902.47 कोटी रुपये ऑपरेटिंग नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेचा ऑपरेटिंग नफा 888.90 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

येस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न मार्च 2024 तिमाहीत 2 टक्क्यांच्या वाढीसह 2,153 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत येस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 2,105 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मार्च 2024 तिमाहीत येस बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन घसरुन 2.4 टक्केवर आले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत येस बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन 2.8 टक्के नोंदवले गेले होते.

येस बँकेचा सकल नॉन परफॉर्मिंग अॅसेट प्रमाण मार्च 2024 तिमाहीत 1.7 टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेचा NPA 2.2 टक्के नोंदवला गेला होता. बँकेचा निव्वळ एनपीए मार्च 2024 तिमाहीत 0.6 टक्केवर होता, तर मागील वर्षी याच तिमाहीत हे प्रमाण 0.80 टक्केवर होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 08 May 2024.