7 May 2024 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Kfin Technologies Share Price | या IPO स्टॉकने अल्पावधीत मालामाल केले, शेअर पुन्हा तेजीत येतोय, कारण काय?

Kfin Technologies Share Price

Kfin Technologies Share Price | ‘केफिन टेक्नोलॉजी’ या वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने आपले डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल नुकताच जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 79 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचा PAT 53 कोटी रुपये नोंदवण्यात आला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 29.8 कोटी रुपये होता. बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 315.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Kfin Technologies Share Price | Kfin Technologies Stock Price | BSE 543720 | NSE KFINTECH)

डिसेंबर 2022 तिमाहीत ‘केफिन टेक्नोलॉजी’ कंपनीचे एकूण उत्पन्न 170 कोटी रुपयांवरून 14 टक्क्यांनी वाढले असून 194 कोटी रुपयेवर पोहचले आहेत. कंपनीचा खर्च 4.8 टक्क्यांनी कमी झाला असून 123 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ‘केफिन टेक्नोलॉजी’ कंपनीच्या IPO शेअर बाजारात खुला करण्यात आला होता. या IPO मध्ये कंपनीने आपल्या शेअरची इश्यू किंमत 347-366 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती. त्याच वेळी बीएसई निर्देशांकावर शेअरने 372.40 रुपये सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. लिस्टिंगच्या दिवशी आयपीओवर सट्टा लावणाऱ्या गुंतवणूकदारांना नाममात्र परतावा मिळाला होता.

या कंपनीचा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल स्वरूपात जारी करण्यात आला होता. हा कंपनीचे प्रवर्तक जनरल अटलांटिक सिंगापूर फंड पीटीई लिमिटेडने IPO मध्ये 1,500 कोटी रुपयांचे शेअर्स खुल्या बाजारात विकले होते. आयपीओच्या वेळी कंपनीच्या प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाकडे 74.37 टक्के भाग भांडवल होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kfin Technologies Share Price 543720 KFINTECH stock market live on 15 February 2023.

हॅशटॅग्स

Kfin Technologies Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x