
HDFC Mutual Fund | एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडाला आज २६ वर्षे पूर्ण होत आहेत. पूर्वी त्याचे नाव एचडीएफसी इक्विटी फंड होते. जो एचडीएफसी एएमसीच्या सर्वोत्तम फंडांपैकी एक आहे. 26 वर्षांत कंपनीने वार्षिक चक्रवाढ व्याज दर 18.44 टक्के नोंदविला आहे. या काळात निफ्टी 500 टीआरआयच्या सीएजीआरमध्ये 12 टक्के सीएजीआर पाहायला मिळत आहे.
HDFC Flexi Cap Fund NAV
या फंडात कोणीही एकदम 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्यांच्याकडे 87.60 लाख रुपये परतावा मिळाला असेल. तसेच या फंडात सुरुवातीपासून 10,000 रुपयांची SIP केली असती तर त्याचे 9.57 कोटी रुपये झाले आहेत.
एचडीएफसी एएमसी फंडाच्या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय त्याच्या अचूक गुंतवणूक धोरणाला देते. व्यवसायातील गुंतवणूक, वैविध्य आणि मूल्यमापन यावर भर दिल्याने फंडाची कामगिरी भक्कम राहिली आहे.
या फंडाचे सध्याचे निव्वळ मालमत्ता मूल्य 882 रुपये आहे. अशा प्रकारे आतापर्यंतचा सीएजीआर 18 टक्क्यांहून अधिक आहे. एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत जैन यांच्या मते, एचडीएफसी फ्लेक्सी फंडाकडे असा पोर्टफोलिओ आहे ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या सामर्थ्याचा फायदा होईल आणि कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा होईल.
सेबीने मल्टी कॅप फंडांसाठी नियम तयार केल्यानंतर एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड फ्लेक्सी कॅप श्रेणीचा भाग बनला आहे. या योजनेत सर्व प्रकारच्या फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. या फंडाने त्या क्षेत्रातील कंपन्यांवर सट्टा लावला आहे, ज्यांचे मूल्यांकन वाजवी आहे आणि ज्यांचे उत्पन्न चांगले वाढण्याची अपेक्षा आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.