11 December 2024 4:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे स्वस्त दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | तज्ज्ञांच्या मते, वायदा बाजारात सोन्याचा दर 68000 रुपये प्रति दहा ग्रॅमचा स्तर गाठू शकतो. ट्रेडबुल्स सिक्युरिटीजनुसार, सोन्याचा भाव 66,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, सोन्याचा दर 67,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर मोतीलाल ओसवाल यांच्या मते, प्रति 10 ग्रॅमची किंमत 66,000 रुपयांची पातळी दर्शवू शकते. एसएमसी ग्लोबल गोल्ड रेट 68,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.

आज सराफा बाजारातील सोन्याचा भाव
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 61454 रुपयांवर खुला झाला. तर आदल्या दिवशी सोने 61590 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 136 रुपयांनी घसरला.

आज सोने उच्चांकी पातळीपेक्षा किती रुपयांनी स्वस्त?
आज सोने आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 1998 रुपयांनी स्वस्त विकले जात आहे. 28 डिसेंबर 2023 रोजी सोन्याच्या दराचा उच्चांक गाठला गेला होता. त्या दिवशी सोन्याचा भाव 63452 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत गेला होता.

आज चांदीचा भाव 69891 रुपये प्रति किलो आहे. त्याआधीच्या दिवशी चांदी 69,150 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो ७४१ रुपयांची वाढ झाली आहे. चांदी 7043 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 30 नोव्हेंबर 2023 रोजी चांदीने 76934 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आज एमसीएक्सवर कोणत्या दराने सोन्याचा व्यवहार?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) आज दुपारी 12 वाजता सोन्याच्या दरात घसरण झाली. आज सोन्याचा वायदा व्यवहार 68.00 रुपयांनी घसरून 61,375.00 रुपयांवर व्यवहार करत होता. तर चांदीचा वायदा व्यापार 115.00 रुपयांच्या वाढीसह 70,267.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

जाणून घ्या आज कोणत्या कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

आज 10 कॅरेट सोन्याचा भाव
10 कॅरेट म्हणजेच 41.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 35951 रुपयांवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर 79 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

आज 14 कॅरेट सोन्याचा भाव
14 कॅरेट म्हणजेच 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 46091 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर 101 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव
18 कॅरेट म्हणजेच 75.0 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 56292 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर 124 रुपयांनी स्वस्त आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव
22 कॅरेट म्हणजेच 91.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 61208 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर 136 रुपयांनी स्वस्त आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव
आज 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा दर 61454 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर 136 रुपयांनी स्वस्त आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates Check Details 15 February 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x