
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. विदेशी ब्रोकरेज हाऊस UBS ने व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 15.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
28 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीचे भाग भांडवल 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 18 रुपये किमतीवर जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 7.47 टक्के वाढीसह 15.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
परकीय ब्रोकरेज हाऊस यूबीएसने, व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 18 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच हा स्टॉक गुरुवारच्या बंद किमतीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढू शकतो. ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांच्या मते, कर्ज थकबाकी भरण्यात भारत सरकारने दिलासा दिला तर व्होडाफोन आयडिया स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 70 ते 80 टक्के वाढू शकतो. व्होडाफोन आयडिया कंपनीने नुकताच 18000 कोटी रुपयेची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
मागील एका वर्षात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे. 24 मे 2023 रोजी व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपनीचे शेअर्स 6.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 24 मे 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 14.58 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील दोन वर्षांत व्होडाफोन आयडिया स्टॉक तब्बल 75 टक्केपेक्षा जास्त वाढला आहे. 2024 या वर्षात व्होडाफोन आयडिया स्टॉक आतापर्यंत 13 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 18.42 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.87 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.