
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला ऑयस्टर ग्रीन हायब्रिड वन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एक मोठा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. ही बातमी जाहीर होताच शेअरने मजबूत उसळी घेतली. शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.96 टक्के वाढीसह 47.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
शुक्रवारी सकाळी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 45.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्यानंतर हा स्टॉक मजबूत तेजीत आला. नुकताच या कंपनीने मध्य प्रदेशात ऊर्जा प्रकल्प उभारणी करण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची बातमी दिली आहे.
ऑयस्टर ग्रीन हायब्रिड कंपनीने सुझलॉन एनर्जी कंपनीला 26 विंड टर्बाइनचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीची ऑर्डर दिली आहे. एका टर्बाइनची क्षमता 3.15 मेगावॅट आहे. म्हणजेच कंपनीला एकूण 81.90 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा टर्बाइनचा पुरवठा करायचा आहे. मागील 10 दिवसांत सुझलॉन एनर्जी कंपनीला मिळालेली ही तिसरी मोठी ऑर्डर आहे.
बुधवारी सुझलॉन एनर्जी कंपनीला आदित्य बिर्ला समूहाने देखील 551.25 मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा करण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता. सुझलॉन कंपनीच्या मते, या प्रकल्पामुळे दरवर्षी 2.66 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल.
मागील एका वर्षभरात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 329 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 15.40 टक्के वाढली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काही दिवसात 53 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.