
Reliance Power Vs Reliance Infra Share | सोमवारी भारतीय शेअर बाजारात अफाट तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स इंडेक्स 2000 पेक्षा जास्त अंकांनी वाढला होता. दरम्यान अनिल अंबानींच्या मालकीच्या कंपन्याचे शेअर्स रॉकेट बनले होते. यामधे रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स सामील होते.
रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने सोमवारी अप्पर सर्किट हीट केला होता. त्याचवेळी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स देखील मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 25.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 4.85 टक्के घसरणीसह 24.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 97 टक्के परतावा कमावून दिला आहे. 5 जून 2023 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 13.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 3 जून 2024 रोजी हा स्टॉक 25.76 रुपये किमतीवर पोहचला होता.
मागील 4 वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 960 टक्के परतावा कमावून दिला आहे. 5 जून 2020 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 2.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आता हा स्टॉक 25.76 रुपये किंमत स्पर्श करून खाली आला आहे.
सोमवारी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 179.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 8.08 टक्के घसरणीसह 159.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 4 वर्षात रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 7.25 टक्के मजबूत झाले आहेत. 5 जून 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 21.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 3 जून 2024 रोजी हा स्टॉक 179.05 रुपये किमतीवर पोहचला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 308 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 131.40 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.