20 May 2024 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Tejas Networks Share Price | टाटा ग्रुपची मोठी हिस्सेदारी, तेजस नेटवर्क्सला मोठी सरकारी कंपनीची ऑर्डर मिळाली, मल्टिबॅगर शेअर तेजीत

Tejas Networks Share Price

Tejas Networks Share Price | तेजस नेटवर्क कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.70 टक्क्यांच्या वाढीसह 935 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र दिवसा अखेर शेअरमध्ये नफा वसुली सुरू झाली, आणि शेअरची किंमत पुन्हा खाली आली.

तेजस नेटवर्क कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, तेजस नेटवर्क कंपनीला बीएसएनएल कंपनीने 750 कोटी रुपये मूल्याची वर्क ऑर्डर दिली आहे. ही बातमी जाहीर होताच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी तेजस नेटवर्क कंपनीचे शेअर्स 0.067 टक्के वाढीसह 894.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

तेजस नेटवर्क कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, बीएसएनएल कंपनीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीला रेडिओ एक्सेस नेटवर्क संबंधित एक ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 750 कोटी रुपये असणार आहे. या ऑर्डरची पूर्तता झाल्यास BSNL कंपनी देशभरात 4G आणि 5G नेटवर्कची सुविधा प्रदान करण्यास सक्षम बनेल. मे 2023 मध्ये BSNL कंपनीने TCS consortium ला 15,000 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर दिली होती.

मागील एका महिन्यात तेजस नेटवर्क कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आणि मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात तेजस नेटवर्क्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 42 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 47.43 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tejas Networks Share Price today on 09 September 2023.

हॅशटॅग्स

Tejas Networks Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x