7 May 2025 10:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC IREDA Share Price | मंदीत संधी, स्वस्त झालेला शेअर देईल 55 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
x

BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर

BEL Share Price

BEL Share Price | मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, आणि शेअर बाजार गडगडला. अनेक सरकारी कंपन्याचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले होते. आता मात्र या शेअरमध्ये मजबूत सुधारणा पाहायला मिळत आहे.

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस CLSA ने शेअर बाजारातील गोंधळाच्या दरम्यान संरक्षण क्षेत्रातील दोन स्टॉकबाबत अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स सामील होते. तज्ञांच्या मते हे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड :
ब्रोकरेज हाऊस CLSA ने भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन 294 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 1.6 टक्क्यांच्या वाढीसह 260 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 6 जून 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स स्टॉक 7.76 टक्के वाढीसह 280.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड :
ब्रोकरेज हाऊस CLSA ने हिंदुस्थान एरोनॉटिक्स स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 4731 रुपये किमतीवर जाऊ शकतात. बुधवारी एचएएल स्टॉक 4,344 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 155 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 6 जून 2024 रोजी हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 9.52 टक्के वाढीसह 4,780.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

CLSA फर्मच्या मते, मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात संरक्षण क्षेत्रामध्ये ‘मेक इन इंडिया’ ला जोरदार चालना देण्यावर भर दिला जाऊ शकतो. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतीय डिफेन्स क्षेत्रात 43 बिलियन डॉलर्स किमतीच्या उत्पादनांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. तज्ञांचा विश्वास आहे की भारतीय संरक्षण क्षेत्राच्या विकासासाठी पुढील काळ सकारात्मक आहे. म्हणून तज्ञांनी या दोन दिग्गज कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 06 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BEL Share Price(109)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या