
Nandan Denim Share Price | नंदन डेनिम लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरूवारी 15 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीने 17 जून 2024 रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक कंपनीचे शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेऊ शकतात.
गुरुवारी नंदन डेनिम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 42.95 रुपये किमतीवर ओपन झाले होते. बाजार बंद होताना हा स्टॉक 11.75 टक्क्यांच्या वाढीसह 45.15 रुपये किमतीवर आला होता. आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी नंदन डेनिम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के वाढीसह 45.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नंदन डेनिम लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 2022 मध्ये मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. आता ही कंपनी आपले शेअर्स विभाजित करू शकते. या कंपनीने स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाहीये. मागील 1 वर्षात नंदन डेनिम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
मागील एका महिनाभरात नंदन डेनिम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांनी वाढले आहेत. जर तुम्ही 6 महिन्यापूर्वी नंदन डेनिम लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 59.60 टक्के वाढले असते. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 121.80 टक्के परतावा कमावून दिला आहे.
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 67.65 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 30.64 रुपये होती. मार्च 2024 तिमाहीपर्यंत या कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 64.87 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 34.65 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.