
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक गुंतवणुकदार अजूनही शेअर बाजारातील अस्थिरता कमी होण्याची वाट पाहत आहेत. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक्सबॉक्स फर्मच्या तज्ञांनी टॉप 3 स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत मजबूत कमाई करून देऊ शकतात. यासाठी तज्ञांनी येस बँक, अदानी पॉवर आणि एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरची सपोर्ट लेव्हल आणि प्रतिकार पातळी.
अदानी पॉवर :
स्टॉक्सबॉक्स फर्मच्या तज्ञांच्या मते, या स्टॉकला 825-900 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. यासह या शेअरने 670 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक 825 रुपये या प्रतिकार पातळीच्या वर गेला तर शेअर अल्पावधीत 900 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.76 टक्के वाढीसह 770 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
SJVN :
स्टॉक्सबॉक्स फर्मच्या तज्ञांच्या मते, या स्टॉकला 150-175 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. यासह या शेअरने 100 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक 150 रुपये या प्रतिकार पातळीच्या वर गेला तर शेअर अल्पावधीत 15-190 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.49 टक्के वाढीसह 133.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
येस बँक :
स्टॉक्सबॉक्स फर्मच्या तज्ञांच्या मते, या स्टॉकला 27-29 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. यासह या शेअरने 24.50 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक 27 रुपये या प्रतिकार पातळीच्या वर गेला तर शेअर अल्पावधीत 29 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.75 टक्के वाढीसह 23.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.