
Penny Stocks| मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारातून मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. अशा काळात अनेक गुंतवणुकदार पैसे लावण्यासाठी स्वस्त शेअर्सच्या शोधत असतात. मात्र स्वस्त पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे फार धोकादायक असू शकते. गुंतवणूक करताना योग्य पडताळणी करून आणि मूलभूत तत्वे तपासूनच गुंतवणूक केली पाहिजे.
मात्र नवीन गुंतवणुकदारांना याबाबत जास्त अनुभव नसल्याने ते कोणत्याही स्वस्त पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. आणि त्यांना नुकसान सहन करावा लागतो. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे मागील आठवडयात 20 ते 45 टक्क्यांनी वाढले होते.
ARC फायनान्स :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.24 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 33.3 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका आठवडाभरात हा स्टॉक 28 टक्क्यांनी वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के घसरणीसह 1.18 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
श्रेष्ठ फिनवेस्ट :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.81 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका आठवडाभरात हा स्टॉक 27 टक्क्यांनी वाढला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 14.92 टक्के वाढीसह 2.08 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Integra essentia :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.31 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका आठवडाभरात हा स्टॉक 27 टक्क्यांनी वाढला आहे. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 4.52 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रिलायन्स होम फायनान्स :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.27 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 46 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका आठवडाभरात हा स्टॉक 27 टक्क्यांनी वाढला आहे. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.29 टक्के घसरणीसह 4.11 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे 97 टक्क्यांपेक्षा जास्त भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांनी धारण केले आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्स :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2.04 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका आठवडाभरात हा स्टॉक 23 टक्क्यांनी वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 83 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 2.12 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.