
Wipro Share Price | विप्रो या आयटी क्षेत्रातील लार्ज कॅप स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी विप्रो स्टॉक 3.62 टक्के वाढीसह 533.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. नुकताच या स्टॉकने 500 रुपये किंमत पार केली आहे. 6 जून 2024 रोजी विप्रो स्टॉक 440 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर सोमवारी हा स्टॉक 534 रुपयेपर्यंत वाढला होता. ( विप्रो कंपनी अंश )
मागील एका महिन्यात विप्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी विप्रो स्टॉक 2.02 टक्के वाढीसह 538 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
ब्रोकरेज फर्म CLSA ने विप्रो स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रोकरेज फर्म CLSA ने विप्रो स्टॉकची रेटिंग अंडरपरफॉर्मवरून आउटपरफॉर्मवर अशी अपग्रेड केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 607 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.77 लाख रुपये आहे. विप्रो कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 545 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 375 रुपये होती.
मागील सहा महिन्यांत विप्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 36.34 टक्के वाढले आहेत. तर मागील दोन वर्षांत विप्रो शेअरची किंमत 25.72 टक्के वाढली आहे. आर्थिक वर्ष 2023-2024 च्या चौथ्या तिमाहीत विप्रो कंपनीने 16593 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 16,315 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2024 तिमाहीत विप्रो कंपनीने 2,446 कोटी रुपये नफा कमावला होता. तर डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 2,022 कोटी रुपये नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.