
Tata Technologies Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सध्या अनेक कंपन्या आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. त्यामुळे शेअर बाजारातील अस्थरीता आणखी वाढली आहे. अशा काळात काही शेअर्समध्ये किरकोळ प्रॉफिट बुकींगही पाहायला मिळत आहे.
तज्ञांच्या मते, आगामी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी ऑटोसह अनेक क्षेत्रात तेजी पाहायला मिळू शकते. अशा काळात गुंतवणूक करून मजबूत नफा कमावण्यासाठी तज्ञांनी मिडकॅप्स स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सेठी फिनमार्टच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप तीन मिडकॅप स्टॉक करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर माहिती.
टाटा टेक्नॉलॉजीज :
सेठी फिनमार्ट फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक दीर्घकाळात 1350 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.29 टक्के वाढीसह 1,028 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 35 टक्के नफा सहज मिळू शकतो. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1400 रुपये होती. ही कंपनी ऑटो क्षेत्रासाठी उत्पादन, विकास आणि डिजिटल सोल्यूशन्स प्रदान करण्याचा व्यवसाय करते.
संघवी मूव्हर्स :
सेठी फिनमार्ट फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक दीर्घकाळात 1170 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 1,091.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1483 रुपये होती. ही कंपनी देशातील सर्वात मोठी क्रेन सेवा प्रदान करणारी कंपनी आहे.
GMDC :
सेठी फिनमार्ट फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक दीर्घकाळात 435 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 405 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.95 टक्के घसरणीसह 418.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 506 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.