
L&T Share Price| लार्सन अँड टुब्रो कंपनीचा शेअर सोमवारी 3 टक्के वाढीसह 3785 रुपये किमतीवर पोहोचला होता. आज देखील हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच कंपनीला भारतात आणि परदेशात ‘सबस्टेशन’ आणि ‘ट्रान्समिशन लाईन्स’ उभारण्याचे मोठे कंत्राट मिळाले आहे. ( लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश )
लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या पॉवर ट्रान्समिशन अॅड डिस्ट्रीब्युटर युनिटला हे कंत्राट देण्यात आले आहे. तसेच कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक 29 जुलै रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या पॉवर ट्रान्समिशन आणि वितरक शाखेला ग्रिड घटकांच्या निर्मितीसाठी 2,500 कोटी ते 5,000 कोटी रुपये मूल्याच्या अनेक ऑर्डर मिळाल्या आहेत.
आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी लार्सन अँड टुब्रो स्टॉक 0.37 टक्के वाढीसह 3,788.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या अंतर्गत वर्गीकरणानुसार 2,500 कोटी ते 5,000 कोटी रुपये दरम्यानचा करार ‘मोठा करार’ मानला जातो. या कंपनीने भारतात दोन डबल सर्किट ट्रान्समिशन लाइन पॅकेजच्या अंमलबजावणीचे मोठे कंत्राट जिंकले आहे. तसेच या कंपनीने UAE मध्ये 380 kW चे सबस्टेशन आणि 380 kW ओव्हरहेड लाईन सेगमेंट बांधण्याचे कंत्राट मिळवले आहे.
लार्सन अँड टुब्रो ही कंपनी 27 अब्ज डॉलर्स बाजार मूल्य असणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम प्रकल्प, उच्च-तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. मागील पाच दिवसांत लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7 टक्के नफा कमावून दिला आहे.
YTD आधारे लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर्सची किंमत 7.04 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40.74 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 175.41 टक्के वाढवले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3,948.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2,586.75 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5,18,221.50 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.