 
						Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. 28 जुलै रोजी मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
या कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही. मागील आठवड्यात शुक्रवारी मोनार्क नेटवर्थ कॅपिटल स्टॉक 2 टक्के वाढीसह 618 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.55 टक्के वाढीसह 667 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड कंपनी प्रथमच आपल्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर वाटप करणार आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्या त्यांच्या फ्री रिझर्व्हला एन्कॅश करण्यासाठी, तसेच प्रति शेअर कमाई आणि पेड-अप कॅपिटल वाढवण्यासाठी गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करत असतात.
बोनस शेअर्स गुंतवणुकदारांना आणि पात्र शेअरधारकांना मोफत दिले जातात. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक्स डेटला किंवा नंतर शेअर्स खरेदी केले तर त्यांना बोनस शेअर्स मिळणार नाही. मोफत बोनस मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांनी रेकॉर्ड तारीखपूर्वी स्टॉक धारण करणे आवश्यक असते. मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड कंपनीने आपल्या इक्विटी शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्यास मंजुरी दिली आहे.
नुकताच या कंपनीने 300 कोटी रुपये मूल्याचा इक्विटी फंड उभारला होता. तसेच कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीचे अधिकृत भागभांडवल 65 कोटी रुपयेवरून 100 कोटी रुपयेपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे. सध्या मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,074 कोटी रुपये आहे. 2024 या वर्षात मोनार्क नेटवर्थ कॅपिटल स्टॉक तब्बल 40 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		