10 May 2025 1:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

Property Knowledge | तुमचं स्वतःचं घर या चुकीमुळे भाडेकरूचे होऊन जाईल, कायद्याची बाजू लक्षात ठेवा - Marathi News

Highlights:

  • Property Knowledge
  • प्रतिकूल ताबा कायदा :
  • अडवर्स पझेशन :
  • घरमालकाने कायम रहावे सतर्क :
Property Knowledge

Property Knowledge | जमीन जुमला, घरे, बंगले, दुकाने, शेती ही सर्व मालमत्ता स्थावर रियल इस्टेटमध्ये मोडते. कोणताच व्यक्ती अशा प्रकारच्या मालमत्तेची चोरी करू शकत नाही. परंतु काहीवेळा बेकायदेशीररित्या तुमच्या मालमत्तेवर कब्जा केला जाऊ शकतो. म्हणजेच तुमच्या मालमत्तेवर दुसरं कोणीतरी हक्क सांगून तुमची जागा बळकाऊ शकतो.

तुमची रियल इस्टेट रिलेटेड कोणतीही मालमत्ता 12 वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत एखाद्या व्यक्तीकडे असेल. किंवा तो व्यक्ती 12 वर्षांपेक्षा अधिक काळ तुमच्या मालमत्तेवर ताबा धरून बसला असेल तर, तुम्ही कंगाल बनू शकता. अशावेळी कोर्टही तुमची मदत करू शकणार नाही.

प्रतिकूल ताबा कायदा :
एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या मालमत्तेवर हक्क सांगितला किंवा त्या व्यक्तीच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तर, त्या कृत्याला ‘प्रतिकूल ताबा कायदा’ असं म्हणण्यात येतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला तुमचं घर किंवा दुकान भाड्याने देण्यापूर्वी काही गोष्टींची योग्य पडताळणी आणि खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असते. तुमच्या खबरदारीमुळे आणि दक्षतेमुळे मालमत्तेवरून कोणताही वाद उद्भवणार नाही. तुम्ही सुद्धा एखाद्या व्यक्तीला दुकान किंवा घर भाड्याने राहण्यासाठी दिलं असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे.

अडवर्स पझेशन :
अडवर्स पझेशन म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. एखाद्या व्यक्तीने मालमत्ता हस्तांतर कायद्यानुसार तब्बल 12 वर्ष एखाद्याच्या जमिनीवर किंवा घरावर आणि दुकानावर बारा वर्षांपासून अधिक काळासाठीचा हक्क सांगितलं असेल तर तो व्यक्ती स्वतःची मालमत्ता समजून कोणालाही विकू शकतो. परंतु प्रतिकूल ताब्याच्या अटी कडक आहेत ज्यामुळे एक छोटी चूक तुमचे फार मोठे नुकसान करू शकते.

काही व्यक्तींना या कायद्याची पुरेपूर माहिती असते. त्यामुळे ते दुसऱ्याची जमीन हडपण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या कायद्याच्या अभावी ज्या व्यक्तीची मालमत्ता आहे त्याला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. आतापर्यंत या गोष्टी अनेक वेळा घडल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सतर्क राहणे गरजेचे आहे. महत्त्वाचं म्हणजे हा कायदा सरकारी मालमत्तेवर लागू होत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा.

घरमालकाने कायम रहावे सतर्क :
बऱ्याचदा काही घरमालक भाडेकरार रिन्यू करण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. परंतु ही चूक तुम्हाला गोत्यात आणू शकते. अडवर्स पझेशन या कायद्याअंतर्गत भाडेकरू घरमालकाची मालमत्ता ताब्यात घेऊ शकतो. परंतु प्रत्येक घरमालकाने या गोष्टी टाळण्यासाठी दरवर्षाला नवीन एग्रीमेंट करून घ्यावे. हे एग्रीमेंट 11 महिन्यांचे असावे. 11 महिने पूर्ण झाल्यानंतर दोन्हीही पक्षांच्या संमतीने नवीन करार करून घ्यावा. जेणेकरून तुम्ही तुमचं घर भाड्याने दिलं आहे याचा पुरावा तुमच्याजवळ सातत्याने राहील.

Latest Marathi News | Property Knowledge 28 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Property Knowledge(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या