Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची स्टॉक प्राईस मालामाल करणार – Marathi News

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समधे आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीच्या (NSE : JioFinance) शेअर्समध्ये 4 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. दरम्यान या कंपनीचे शेअर्स 325 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसभरात या कंपनीचे शेअर्स 363 रुपये किमतीवर पोहोचले होते. (जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश)

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी जिओ फायनान्शिअल सर्विसेस कंपनीचे शेअर्स 1.68 टक्के घसरणीसह 353.10 रुपये किमती वर ट्रेड करत आहेत.

तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 8.4 टक्के घसरले आहेत. या कंपनीच्या शेअरची सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी 394.70 रुपये होती. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स 2025 या वर्षात 576 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच सध्याच्या किंमत पातळीच्या तुलनेत हा स्टॉक 59 टक्के वाढू शकतो.

दीर्घकालीन टारगेट प्राईस
शेअर बाजारातील तज्ञ जिओ फायनान्शिअल सर्विसेस कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात मजबूत तेजीत वाढू शकतो. तज्ञांना अपेक्षा आहे की 2026 मध्ये या कंपनीचे शेअर्स 725 रुपये, 2027 मध्ये 862 रुपये आणि 2028 मध्ये 1000 रुपये किमतीवर जाऊ शकतात. जर हा स्टॉक 1047 रुपये किमतीवर पोहचला तर गुंतवणूकदारांना 189 टक्के परतावा मिळू शकतो. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते जिओ फायनान्शिअल सर्विसेस कंपनीच्या शेअर्सचा दीर्घकालीन दृष्टीकोन सकारात्मक आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price 30 September 2024 Marathi News.