14 November 2019 1:09 PM
अँप डाउनलोड

विवो'चा नवीन बजेट स्मार्टफोन : विवो Y90

Vivo, Y90, Vivi Y90, Samsung, Oppo, OnePlus Smartphone

मुंबई : ह्या महागाईच्या जगात जिथे मोठमोठ्या कंपन्या महागडे असे स्मार्टफोन मार्केट मध्ये आणत आहेत तिथेच विवो’ने आणला आहे, आपल्या खिशाला परवडणारा असा स्मार्टफोन विवो Y90. हा स्मार्टफोन तब्बल ६,६९० रुपयांना भारतीय मार्केट मध्ये उपलब्ध होणार आहे. विवो Y90 हा विवो च्या Y सिरीज मधील सर्वात स्वस्त मोबाईल असून ह्या स्मार्टफोन फेस-अनलॉक फिचर सुद्धा आहे.

विवो Z1 Pro नंतर ह्या महिन्यातला हा दुसरा असा स्मार्टफोन आहे जो विवो मोबाईल कंपनी ने लाँच केला आहे. बजेट स्मार्टफोन्स रेंज म्हणून विवो ची Y सिरीज प्रसिद्ध आहे. विवो Y90 चे उत्पादन हे ग्रेटर नोएडा येथे विवो च्या फॅक्टरी मध्ये होणार असल्याचे कळतंय. ह्या फोन ची स्क्रीन 6.22 असून पूर्णतः एचडी डिस्प्ले सहित आहे.

ड्युल सिम असणाऱ्या ह्या फोन मध्ये २ नॅनो सिम स्लॉट आणि १ मेमरी कार्ड स्लॉट आहे ज्याची क्षमता 256GB पर्यंत आहे. विवो Y90 हे क्वॉड-कोर मीडिया टेक हेलिओ A22 SoC प्रोसेसर सहित लाँच होणार आहे. ह्या प्रोसेसर ला साथ देण्यास विवो Y90 ला 2GB रॅम आणि 32GB रोम स्पेस दिलं गेलं आहे. ह्या स्मार्टफोन मध्ये अँड्रॉईड व्हर्जन ओरिओ 8.0 असून ह्याचा ऑपरेटिंग सिस्टम हा विवो चा फनटच OS 4.5 आहे. ह्या स्मार्टफोन चा बॅक कॅमेरा 8 मेगापिक्सेल’चा असून पावरफुल अश्या एलईडी फ्लॅश सहित आहे व फ्रंट कॅमेरा हा 5 मेगापिक्सेल चा आहे. ह्या स्मार्टफोन ला दमदार अशी 4030 Mah बॅटरी ने चार्ज. FM रेडिओ, वायफाय, ब्लुटूथ आणि गिपीएस असे अनेक फीचर्स ह्या स्मार्टफोन मध्ये आहेत. हा बजेट स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीला २७ जुलै २०१९ रोजी मार्केट मध्ये आला आहे.

हॅशटॅग्स

#gadgets(13)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या