Baroda BNP Paribas Mutual Fund | बडोदा बीएनपी परिबस फंड लॉन्च, सुरुवातीलाच एंट्री घेऊन दीर्घकाळात करोडो कमवा
Baroda BNP Paribas Mutual Fund | बडोदा बीएनपी परिबस म्युच्युअल फंडाने बडोदा बीएनपी परिबस फ्लेक्सी कॅप फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही एक डायनॅमिक इक्विटी गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप या तिन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
बडोदा बीएनपी परिबस म्युच्युअल फंडाने बडोदा बीएनपी परिबास फ्लेक्सी कॅप फंड गुंतवणुकीसाठी सुरू केला आहे. ह्या डायनॅमिक इक्विटी गुंतवणूक योजनेच्या माध्यमातून लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप या तिन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या फंडाचा मुख्य उद्देश विविध क्षेत्रांमध्ये आणि सर्व प्रकारच्या बाजार भांडवलाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या संधी ओळखणे आणि गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवणे हा आहे. तसेच, इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित गुंतवणूक योजनांमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करून गुंतवणूकदारांचा नफा वाढवणे असे उदेश्य आहेत.
गुंतवणूक कालमर्यादा :
5 ऑगस्ट 2022 पर्यंत या योजनेत आपण गुंतवणूक करू शकता. या योजनेची नवीन फंड ऑफर 25 जुलै 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुली करण्यात आली आहे. या योजनेत आपल्याला 5 ऑगस्ट 2022 पर्यंत गुंतवणूक करता येईल.
सर्वांसाठी उत्तम गुंतवणूक संधी :
बाजारातील काही प्रमुख म्युचुअल फंड तज्ञ आणि गुंतवणूकदार यांचे म्हणणे आहे की आपण ज्या जगात राहतो ते सतत विकसित होत आहे. इक्विटी मार्केट देखील हा बदल दर्शवत असतात. ते म्हणाले की सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्या, चांगली कामगिरी करणारी क्षेत्रे तसेच अर्थव्यवस्था आणि व्यवसाय विकसित होत असताना कंपन्यांचे आणि म्युचुअल फंडाचे बाजार भांडवल बदलत राहते. त्यासाठी म्युचुअल फंड गुंतवणूक करताना योग्य निवड खूप महत्वाची आहे.
फ्लेक्सी कॅप फंड :
फ्लेक्सी कॅप फंड बाजार भांडवल आणि गुंतवणूक क्षमतेनुसार गुंतवणूकदारांसाठी अधिक चांगला परतावा मिळवू शकतात. त्याच वेळी, हे फंड तुम्हाला बाजारातील परिस्थिती, मूल्यमापन आणि भविष्यातील वाढीच्या सकारात्मक परिस्थितीवर आधारित पोर्टफोलिओ तयार करण्याची परवानगी देतात. असे गुण फ्लेक्सी कॅप फंडला एक असे इक्विटी इनवेस्टमेंट सोल्यूशन बनवते जे सर्व प्रकारच्या बाजार परिस्थितीशी सुसंगत आहे. त्याच वेळी, गुंतवणूकदारांना अस्थिरतेसह जोखमीपासून संरक्षण देखील मिळते.
उत्तम जोखीम व्यवस्थापन :
म्युचुअल फंड तज्ञ आणि अर्थ तज्ञ म्हणतात की ही योजना गुंतवणुकीसाठी त्रि-आयामी दृष्टिकोन असलेली एक परिपूर्ण योजना आहे. म्युचुअल फंड गुंतवणूक करताना सर्वोत्कृष्ट सेक्टर्स निवडण्यासाठी टॉप-डाउन दृष्टिकोन, मार्केट कॅप निवडण्यासाठी क्षैतिज दृष्टिकोन आणि सर्वोत्तम स्टॉक्स निवडण्यासाठी बॉटम-अप दृष्टिकोन स्वीकारला गेला पाहिजे. बाजार भांडवलीकरण आणि क्षेत्रातील संधी शोधण्यात लवचिकता असल्यामुळे ही योजना गुंतवणूकदारांसाठी सुलभ झाली आहे. त्यामुळे, या योजनेला विविधीकरणाद्वारे वाढीच्या संभाव्यतेचे फायदे घेण्यासाठी तसेच जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी मदत केली जाऊ शकते.
मजबूत वाढ असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करा :
ही म्युचुअल फंड योजना मजबूत व्यवसाय, मजबूत आर्थिक क्षमता, अनुभवी आणि योग्य व्यवस्थापन, असलेल्या कंपन्यांची ओळख करून त्यात गुंतवणुकीच्या नवीन संधीची पडताळणी करते. बडोदा बीएनपी परिबस फ्लेक्सी कॅप फंड शेवटच्या वाटप तारखेपासून 5 दिवसांच्या आत गुंतवणुकीसाठी आणि नवीन सदस्यत्वासाठी पुन्हा उघडला जाईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Baroda BNP Paribas Mutual Fund investments opportunity benefit on 3 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा