 
						NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीचे शेअर्स आज किंचित वाढीसह क्लोज झाले आहेत. सोमवारी या कंपनीचे (NSE: NBCC) शेअर्स 1.5 टक्के वाढीसह 180.20 किमतीवर पोहोचले होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून 101 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.45 टक्के वाढीसह 180.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
कंपनीला मिळाले कॉन्ट्रॅक्ट
एनबीसीसी इंडिया कंपनीने सोमवारी एक निवेदन जाहीर करून माहिती दिली होती की, त्यांना 101 कोटी रुपयेची वर्क ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. तसेच मागील आठवड्यात या कंपनीला आयआयटी नागपुरमध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 75 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली होती.
यापूर्वी एनबीसीसी इंडियाची उपकंपनी, HSCC इंडियाला 1,261 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. या कॉन्ट्रॅक्टअंतर्गत एचएससीसी इंडिया लिमिटेड कंपनीला दरभंगा बिहारमध्ये AIIMS हॉस्पिटलची स्थापना करण्याचे काम मिळाले होते.
शेअरने 481% परतावा दिला
मागील दोन दिवसांत एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअरची किंमत 4.96 टक्के वाढली आहे. 2024 या वर्षात एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 118.67 टक्के वाढली आहे. मागील दोन वर्षांत एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 481.63 टक्के परतावा कमावून दिला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		