 
						Salary Management | बऱ्याच व्यक्ती आपलं भविष्य सुरक्षित व्हावं यासाठी ठिकठिकाणी पैसे गुंतवणुकीचे मार्ग शोधतात. आपल्या पगारातील काही रक्कम प्रत्येक महिन्याला एका वेगळ्या खात्यामध्ये सेव म्हणजे जमा व्हावी यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात. परंतु काही लोकांना पैसे बचत करण्याचं काहीही पडलेलं नसतं. हातात पैसा आला की तो खर्च करायचा आपला तात्पुरता उदरनिर्वाह कसा होईल याकडे लक्ष द्यायचं.
परंतु फक्त याच गोष्टीशी निगडित राहणाऱ्या व्यक्तींना भविष्यामध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकते. याचाच अर्थ अधिक खर्च करणाऱ्या व्यक्तीच्या हातात कितीही पगार असला तरी, शिल्लक रक्कम उरत नाही. जरी रक्कम शिल्लक राहिली तरी सुद्धा, महिन्याच्या शेवटी बचत करून काहीही फायदा नसतो. कारण की आपले तेही पैसे कोणता ना कोणता कामासाठी खर्च होऊन बसतात. तुमची सुद्धा अशीच काहीशी कहाणी असेल तर, पगार हातात आल्याबरोबर हे एक काम करा. मग बघा प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यात जमाखर्चसाठी जाईल.
पगार खात्यात आल्याबरोबर करा हे एक काम :
वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य व्यक्तींना बसतोच. त्याचबरोबर वाढत्या महागाईचा प्रादुर्भाव लक्षात घेता बऱ्याच व्यक्तींचा पगार सर्वसामान्य खर्चासाठीच पुरेनासा होतो. आता या मधून किती बचत करावी आणि किती पैसे खर्चसाठी वापरावे त्याचं नियोजन बऱ्याच जणांना जमवता येत नाही. या कारणामुळे सुद्धा अनेकांना भविष्यासाठी बचत करायला जमत नाही.
परंतु तुम्ही तुमच्या पैशांचं नियोजन करून म्हणजेच प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या पगाराचं व्यवस्थित नियोजन करून, खर्चाचा ताळमेळ सुधारून एक ठराविक रक्कम दरमहा बाजूला काढू शकता. तुम्हाला तुमच्या पगारातील 20% भाग प्रत्येक महिन्याला बाजूला काढायचा आहे. त्याचबरोबर महिन्याच्या शेवटी नाही तर, पगार मिळाल्याबरोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तुम्ही सेविंग करणारी रक्कम बाजूला काढली पाहिजे. तरच तुम्ही तुमच्या भविष्यासाठी निधी जमा करू शकता.
पैसे बचतीसाठी या गोष्टी देखील करून पहा
1) अतिरिक्त खर्च कमी करा :
समजा तुम्ही कुटुंबप्रमुख आहात आणि तुमच्या कुटुंबामध्ये 4 सदस्य राहत आहेत. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 50,000 हजार पगार मिळतो. तर या पगारातील 20,000 हजार रुपये प्रत्येक महिन्याला सेविंगसाठी बाजूला काढले पाहिजेत. त्याचबरोबर तुम्ही तुमचा अतिरिक्त खर्च देखील कमी केला पाहिजे. लक्झुरिअस लाईफ जगण्यापेक्षा साधारण आयुष्य जगण्याला महत्व दिलं पाहिजे. तरच तुम्ही भविष्यामध्ये चांगली रक्कम जमा करू शकता.
2) महागड्या कपड्यांवर खर्च कमी करा :
बऱ्याच व्यक्तींना वारंवार महागडी कपडे घेणे आवडते. परंतु सतत महागडी कपडे घेऊन तुम्ही खर्चाच्या आधीन जाता. त्याचबरोबर तुमच्याही लक्षात येत नाही की, तुमचा पगार आल्या आल्या कसं काय संपला. एक्स्ट्रा आणि जास्तीच्या खर्चांमुळे तुम्हाला बचत करण्यासाठी अवघड जाऊ शकते. त्यामुळे कमीत कमी खर्च कसा होईल याकडे लक्ष द्या.
पैसे गुंतवणुकीचे हे मार्ग आहेत सोपे :
आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, पगारामधील ठराविक रक्कम बाजूला काढून नेमकी ठेवावी कुठे. यासाठी तुम्ही सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेऊ शकता. कारण की सरकारच्या योजनांमध्ये सुरक्षा आणि चांगले व्याजदर मिळते. एवढेच नाही तर तुम्ही म्युचल फंड, एसआयपी, पीपीएफ यांसारख्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करू शकता.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		