
Monthly Pension Scheme | बऱ्याच व्यक्ती नोकरीला असतानाच रिटायरमेंटनंतरच आयुष्य आनंदात आणि अल्हाददायक जावं यासाठी गुंतवणुकीचे मार्ग शोधतात. काहीजण रिटायरमेंटनंतर आधीच चांगला फंड जमा करून ठेवतात. तर, काहीजण अशा योजनांमध्ये पैसे गुंतवतात ज्यामधून तुम्हाला गुंतवणुकीनुसार प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भन्नाट योजनेबद्दल सांगणार आहोत.
या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना असं आहे. या योजनेमध्ये तुम्ही केवळ 210 रुपयांची गुंतवणूक करून प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयांची पेन्शन मिळवू शकता. या पेन्शनमुळे तुम्ही तुमचे घरही चालवू शकता. त्याचबरोबर या मंथली पेन्शन योजनेत तुम्ही 18 ते 40 वय-वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता आणि 60 वर्षानंतर तुम्ही गुंतवणूक करू शकत नाही.
अटल पेन्शन योजना :
अटल पेन्शन योजना ही सामान्य प्रवर्गातील नोकरदारांसाठी अत्यंत फायद्याची योजना ठरू शकते. कारण की या योजनेत तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे बचत करू शकता. त्याचबरोबर बचतीचे मूल्य देखील कमी दिले गेले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि अटल पेन्शन योजनेमध्ये खातं उघडण्यासाठी तुमचं कोणत्याही बँकेमध्ये खातं उघडलेलं असलं पाहिजे.
यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन अटल पेन्शन योजनेचा फॉर्म भरावा लागेल. ज्यामध्ये तुमचं वय, मोबाईल नंबर, बँक अकाउंट नंबर, तुमचा पत्ता आणि फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती भरून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडून लागणारे इतर डॉक्युमेंट्स देखील मागितले जातील आणि तुमचं अटल पेन्शन योजनेमध्ये अकाउंट ओपन केलं जाईल.
18, 25 आणि 30 वय वर्ष असताना किती गुंतवणूक करावी लागेल :
या योजनेमध्ये तुम्ही वयानुसार पैसे गुंतवू शकता. तुम्ही 18 वर्षापासूनच अटल पेन्शन योजनेचा भाग होण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 210 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ती गुंतवणूक तुम्ही 42 वर्षांपर्यंत करू शकता. पुढे 25 वय वर्ष असताना गुंतवणूक सुरू केली तर, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 376 रुपये गुंतवावे लागतील. ही गुंतवणूक तुम्ही 35 वर्षांपर्यंत करू शकता. त्यानंतर 30 व्या वर्षापासून तुम्ही गुंतवणूक सुरू केली तर, 30 वर्षे होईपर्यंतच तुम्ही गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला 577 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
31, 35 आणि 40 वर्षांसाठी किती गुंतवणूक करावी लागेल :
एखादा व्यक्ती त्याच्या वयाच्या 31 व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू करत असेल तर त्याला 660 रुपयांची गुंतवणूक प्रत्येक महिन्याला करावी लागेल. ही गुंतवणूक तो 29 वर्षापर्यंत करू शकतो. त्याचबरोबर 35 वय वर्ष असलेल्या व्यक्तीला 902 रुपये दरमहा गुंतवावे लागतील हे गुंतवणूक तो 25 वर्षांपर्यंत करू शकतो. पुढे 40 व्या वर्षाचा व्यक्ती गुंतवणूक सुरू करत असेल तर त्याला वीस वर्षांपर्यंत गुंतवणूक करायला मिळेल. यामध्ये त्याला 1454 रुपये प्रत्येक महिन्याला भरावे लागतील.