
Reliance Power Share Price | रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपच्या दोन कंपन्या रिलायन्स पॉवर लिमिटेड आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड पुन्हा गुंतवणूकदारांच्या फोकसमध्ये (NSE: RPOWER) आल्या आहेत. कारण, रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपच्या या प्रमुख कंपन्या आता 17,600 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहेत. तसेच कंपनी या निधीचा वापर कर्जमुक्त होणे आणि कंपनी विकासासाठी वापरणार आहे.
कंपनीकडून मोठी भांडवल उभारणी
रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपने सप्टेंबर 2024 मध्ये इक्विटी शेअर्सच्या प्रिफरेंशियल इश्यूद्वारे 4,500 कोटी रुपये आणि टॉप ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फर्म वर्डे पार्टनर्सकडून इक्विटी-लिंक्ड लॉन्ग टर्म एफसीसीबीच्या माध्यमातून 7,100 कोटी रुपये उभारण्याची अधिकृत घोषणा केली होती.
रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रा शेअरला फायदा
त्यासाठी मॅच्युरिटी पीरियड दहा वर्षांचा आणि 5 टक्के व्याज दर असे सांगण्यात आले होते. या घोषणेनंतर रिलायन्स पॉवर लिमिटेड आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या दोन्ही कंपनीच्या शेअर्सची तुफान खरेदी सुरु झाली होती. दरम्यान, आज सोमवार दिनांक 07 ऑक्टोबर 2024 रोजी रिलायन्स पॉवर शेअर 5.00 टक्के घसरून 48.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. तर सोमवार दिनांक 07 ऑक्टोबर 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर शेअर 2.27 टक्के घसरून 294.30 रुपयांवर ट्रेड करत आहे.
कंपनीने काय म्हटले
रिलायन्स अनिल अंबानी ग्रुप क्यूआयपीच्या माध्यमातून अतिरिक्त 6,000 कोटी रुपये उभारले जातील. तसेच रिलायन्स पॉवर लिमिटेड आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड प्रत्येकी 3,000 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, या ठरावामुळे महिन्याच्या अखेरीस भागधारकांची मंजुरी अपेक्षित असल्याचे संबधित अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.
रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपने निवेदन देताना म्हटले की, इक्विटी किंवा इक्विटी-लिंक्ड दीर्घकालीन रोख्यांद्वारे भांडवल उभारण्याच्या रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपच्या धोरणामुळे समूहातील कंपन्यांना विस्तार योजनेसाठी आवश्यक असलेलं भांडवल उपलब्ध होईल. तसेच डेट टू इक्विटी रेशो केवळ 70:30 असूनही इक्विटी किंवा इक्विटी लिंक्ड बाँड्सच्या माध्यमातून 17,000 कोटी रुपये उभे करण्यात आले असून, रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपमधील कंपन्यांकडे पुढील काही वर्षांत त्यांच्या व्यवसाय योजनांसाठी 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. या घडामोडीनंतर दोन्ही रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपमधील कंपन्यांची नेटवर्थ 25,000 कोटी रुपये इतकी होईल असं कंपनी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.