
BEL Share Price | बुधवारी शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून झाली. बुधवारी आरबीआय’ने रेपो रेट कायम ठेवल्याने देखील सकारात्मक (NSE: BEL) परिणाम झाला. मागील सहा दिवसांच्या पडझडीनंतर शेअर बाजार पुन्हा सावरताना दिसत आहे. या तेजीत PSU शेअर्स सर्वाधिक तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे BEL कंपनीचा शेअर सुद्धा फोकसमध्ये आला आहे. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंश)
BEL शेअरसाठी खरेदीचा सल्ला
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची बुधवारी खरेदी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शेअर बाजार विश्लेषक देखील BEL शेअरसाठी खरेदीचा सल्ला देतं आहे. दोन दिवसातील तेजीत सरकारी कंपनीचा शेअर्सनी मोठा परतावा दिला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड शेअर बुधवारी 0.84% वाढून 282.60 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी या शेअरमध्ये ५% वाढ झाली होती. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर1.66 टक्के वाढून 287.10 रुपयांवर ट्रेड करत होता.
शेअर चार्टवर कोणते संकेत?
BEL कंपनीच्या शेअरची किंमत मागील काही दिवस घसरत होती. मात्र आता मंगळवारपासून BEL शेअर दैनंदिन चार्टवर तेजीचे संकेत दिसत आहेत. स्टॉक चार्टवर बुलिश पॅटर्न तयार होत आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दरम्यान, BEL कंपनीला नवी ऑर्डर मिळाल्याची माहित समोर आली आहे. तज्ज्ञांनी या शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना शॉर्ट टर्म साठी ३२० रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. आजच्या तारखेपर्यंत कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,06,465 कोटी रुपये आहे.
BEL शेअरने दिलेला परतावा
BEL शेअरने YTD आधारावर ५१.४२% परतावा दिला आहे. मागील गेल्या 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, 5 वर्षे आणि 10 वर्षांत BEL कंपनीच्या शेअरचे अनुक्रमे 101.66%, 163.72%, 320.41%, 706.33% आणि 1304.51% इतका परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.