
IREDA Share Price | इंडियन रिन्युएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीच्या सकारात्मक निकालानंतर (NSE: IREDA) आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, ‘इंडियन रिन्युएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीत मोठा नफा कमावला आहे. (इरेडा कंपनी अंश)
सूचीबद्ध झाल्यापासून शेअरने 270% परतावा दिला
इंडियन रिन्युएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या वाढीची गती सकारात्मक असल्याने मूल्यांकन आणखी वाढेल असा अंदाज आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे. इंडियन रिन्युएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा शेअर २०२३ नोव्हेंबरमध्ये स्टॉक मार्केटवर सूचीबद्ध झाला होता. स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाल्यापासून IREDA शेअरने 270% परतावा दिला आहे. तसेच, २०२४ या वर्षी आतापर्यंत शेअरने 110% परतावा दिला आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.11 टक्के घसरून 215.29 रुपयांवर पोहोचला होता.
शेअरची टार्गेट प्राईस
आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने IREDA शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेजने या शेअरसाठी 280 रुपये टार्गेट प्राईस दिला आहे. त्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी दिला आहे. म्हणजे हा शेअरला सध्याच्या किंमतीपेक्षा 27% परतावा देऊ शकतो. या शेअरने शॉर्ट टर्म मध्ये गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
ICICI डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने काय म्हटले?
इंडियन रिन्युएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी दुसऱ्या तिमाहीत चांगली केल्याचे आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. IREDA कंपनीच्या AUM मध्ये वार्षिक आधारावर 36% वाढ झाली आहे. तसेच कंपनीच्या ‘NII’ मध्ये वाढ झाली आहे. तसेच IREDA कंपनी डेव्हलपमेंट आणि मार्जिनला चालना देण्यासाठी अक्षय ऊर्जा आणि रिटेल व्यवसायात प्रवेश करणार आहे. तसेच भविष्यातील मजबूत वाढीसाठी 4500 कोटी रुपये उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
कंपनीच्या निव्वळ नफ्यात मोठी वाढ
इंडियन रिन्युएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा दुसऱ्या तिमाहीतील निव्वळ नफा वार्षिक आधारावर 284.73 कोटी वरून 387.75 कोटी इतका वाढला आहे. तसेच आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत इंडियन रिन्युएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा महसूल 1630.38 कोटी रुपये होता. मागील वर्षी याच कालावधीत तो 1176.96 कोटी रुपये इतका होता. याशिवाय इंडियन रिन्युएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे व्याज उत्पन्न 360 कोटी रुपयांवरून 547 कोटी रुपये झाले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.