9 May 2024 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tax Saving Mutual Funds | पगारदारांनो! वर्षानुवर्षे पैशांचा वर्षाव करणाऱ्या टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा Penny Stocks | श्रीमंत करतील हे 9 पेनी शेअर्स, अल्पावधीत मिळतोय 40 टक्केपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 12 रुपये! तज्ज्ञांचा स्टॉक 'होल्ड' करण्याचा सल्ला, पुढे 100% परतावा देईल Stocks To Buy | पैशाने पैसा वाढवा! हे 5 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात, लिस्ट सेव्ह करा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर स्वस्तात खरेदी करा, यापूर्वी 350% परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत झाली Ashok Leyland Share Price | अशोक लेलँडसहित या 2 शेअर्सवर मजबूत ब्रेकआउट, मिळेल 40 टक्केपर्यंत परतावा IPO GMP | पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 132 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका
x

पावसामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील वाहतूक जवळपास ठप्प होण्याच्या दिशेने

Western Railway, Central Railway, harbor Railway, Heavy Rain, Mumbai Rain

मुंबई : मुंबई आणि परिसरात कालपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने थैमान घातले आहे. आजही दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून आज हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक कोलमडली असून रेल्वे रूळही पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूकही कोलमडली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

मध्य रेल्वेसोबत पश्चिम रेल्वेलाही या पावसाचा फटका बसला आहे. वसई-विरार आणि नालासोपारा स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पावसाचं पाणी आल्या्मुळे या मार्गावरची सेवा बंद करण्यात आली आहे. या मार्गावरच्या सर्व लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून जलद मार्ग बंद केला असून. चर्चगेट ते बोरिवली मार्गावर सेवा सुरु असून १५-२० मिनीटं गाड्या उशीराने धावत आहेत.

डोंबिवलीला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा फटका बसला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. सर्वाधिक फटका डोंबिवली एमआयडीसीतील निवासी भागाला बसला आहे. येथील मिलापनगर, तलाव रोड या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून येथील काही बंगल्यांमध्येही पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. येथील काही सोसायट्यांच्या इलेक्ट्रिक मीटर बॉक्स पर्यन्त पाणी आले आहे. असाच पाऊस पडत राहिला तर परिस्थिती अजून खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकुर्ली रेल्वे यार्ड आणि पूर्वीचे पॉवरहाऊस मध्ये काही ठिकाणी खाडीचे पाणी जमले आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते ही पाण्याखाली गेले असून येथील नांदिवली परिसरातील मठाच्या आवारातील पुरातन वृक्ष कोसळल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. नांदीवली टेकडीवर जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. डोंबिवली पश्चिमेतील खाडीलगतच्या चाळींमध्येही पाणी शिरले आहे कल्याण पश्चिमेतील खाडी परिसर असो अथवा पुर्वेतील सखल भाग याठिकाणच्या घरांमध्येही पाणी जायला सुरुवात झाली आहे. पूर्वेतील एफ केबीन वालधुनी या भागालाही पावसाचा फटका बसला आहे.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x