
EPFO Passbook | ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन ही संस्था कर्मचाऱ्याला रिटायरमेंटपर्यंत चांगला निधी जमा करण्यासाठी ईपीएफ आणि ईपीएस माध्यमातून गुंतवणूक सुरू ठेवते. जेणेकरून निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याकडे एक रक्कमी भरघोस पैसे येतात. ईपीएसमध्ये कर्मचारी आपल्या पगारातील काही रक्कम जमा करत असतात. त्याचबरोबर कंपनीकडूनही कर्मचाऱ्यांच्या खात्यात योगदान होत असते.
ईपीएफ अंतर्गत असणारे बऱ्याच अशा कर्मचाऱ्यांना एक गोष्ट ठाऊकच नाही आहे. ती म्हणजे, जॉबवर असताना देखील तुम्ही पेन्शन प्राप्त करू शकता. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या नियमांबद्दल पुरेपूर माहिती असणे गरजेचे आहे.
प्रत्येक महिन्याला एवढे योगदान करा :
कर्मचारी आपल्या पगारातून प्रत्येक महिन्याला 12% योगदान देते. यामधील 8.3% पीएफ खात्यात तर, 3.67% ईपीएफ खात्यात जमा होते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला 50 ते 58 या वयामध्ये म्हणजेच रिटायरमेंट होण्याआधीच पेन्शन हवी असेल तर, त्यांना नंतर मिळणाऱ्या पेन्शनपेक्षा कमी पेन्शन मिळेल.
जॉब बरोबर पेन्शन हवी असेल तर काय करावे :
पेन्शनसाठी योग्य वय 60 वर्ष आहे. परंतु बरेच कर्मचारी 50 वर्षांचे असतानाच पेन्शन प्राप्तीसाठी मागणी करतात. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या नियमांप्रमाणे पुढे जावं लागेल.
तुम्हाला जॉबबरोबर पेन्शन हवी असेल तर, तुमचं कंपनीमध्ये योगदान 10 वर्षांपेक्षा जास्त असल्या पाहिजे. त्याचबरोबर तुमचं वय 50 वर्ष देखील असायला हवं. समजा तुमचं वय 50 वर्षांपेक्षा कमी असेल आणि दहा वर्षे पूर्ण झाली असतील तरीसुद्धा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.