
SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर (NSE: SJVN) केले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत 2024-25 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीतील एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचा नफा 439 कोटी रुपयांवरून 441 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. (एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश)
एसजेव्हीएन कंपनीचा महसूल वाढला
एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचा दुसऱ्या तिमाहीतील महसूल 878 कोटी रुपयांवरून वाढून 1,026 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी EBITDA मार्जिन 80.4% वरून 80.7% पर्यंत वाढली आहे. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी EBITDA ७०६.१ कोटींवरून ८२८.४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
दुसऱ्या तिमाही निकालाच्या घोषणेनंतर एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचा शेअर 1.36 टक्क्यांनी वधारून 112.93 रुपयांवर व्यवहार करत होता. २०२४ मध्ये हा शेअर आतापर्यंत २२ टक्क्यांनी वाढला आहे.
एलारा कॅपिटल ब्रोकरेज फर्म
एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचा दुसऱ्या तिमाहीतील सरकारात्मक आकडेवारीनंतर शेअरमध्ये तेजीचे संकेत आहेत. एलारा कॅपिटल ब्रोकरेज फर्मने एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअरला ‘Accumulate’ रेटिंग दिली आहे. एलारा कॅपिटल ब्रोकरेज फर्मने एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअरसाठी १५२ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात हा शेअर 14.74% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 53.75% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 360.94% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 21.56% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.