 
						KPI Green Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप (NSE: KPIGREEN) करणार आहे. केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी गुंतवणूकदारांना 1:2 च्या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच केपीआय ग्रीन एनर्जी शेअर्स गुंतवणूकदारांना दोन शेअर्समागे एक शेअर बाेनस मिळेल. मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी केपीआय ग्रीन एनर्जी शेअर 2.05% टक्के घसरून 760.75 रुपयांवर पोहोचला होता. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे एकूण मार्केट कॅप 9975 कोटी रुपये आहे. (केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
बोनस शेअर्स रेकॉर्ड तारीख
केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या गुंतणूकदारांना सध्याच्या 5 रुपयांच्या प्रत्येक 2 शेअर्ससाठी 5 रुपयांचा 1 बोनस शेअर जारी केला जाईल. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीकडून बोनस शेअर्स 14 जानेवारी 2025 पर्यंत गुंतणूकदारांना दिले जातील. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने अजून रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही.
कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल
दुसऱ्या तिमाहीत केपीआय ग्रीन लिमिटेड कंपनीचा महसूल 67 टक्क्यांनी वाढून 360 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत तो आकडा 215 कोटी रुपये इतका होता. त्याच वेळी आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत केपीआय ग्रीन लिमिटेड कंपनीच्या नफ्यात 3.44 टक्क्यांनी वाढ होऊन तो 348 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, दुसऱ्या तिमाहीत केपीआय ग्रीन लिमिटेड कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 100 टक्क्यांनी वाढून तो 70 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत तो आकडा 35 कोटी रुपये इतका होता.
शेअरने 10390% परतावा दिला आहे
मागील 6 महिन्यांत केपीआय ग्रीन शेअर्स 21 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, २०२४ या वर्षात आतापर्यंत केपीआय ग्रीन शेअरने 60% परतावा दिला आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत 7.25 रुपये होती. आता केपीआय ग्रीन शेअर 760.45 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच केपीआय ग्रीन शेअरने गुंतवणूकदारांना 10390% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		