SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी – NSE: SJVN

SJVN Share Price | सोमवारी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला (NSE: SJVN) मिळाली होती. सोमवारी हा शेअर 5.79 टक्क्यांनी वधारला होता. सोमवार 25 नोव्हेंबर रोजी हा शेअर 5.79 टक्के वाढून 113.80 रुपयांवर पोहोचला होता. केवळ २ दिवसात शेअरने १२ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. (एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश)

एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने राजस्थान सरकारसोबत झालेल्या कराराची माहिती शेअर बाजाराला दिली आहे. एसजेव्हीएन कंपनीमध्ये केंद्र सरकारची ५५% हिस्सेदारी आहे. वर्षभरात एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअर ३५ टक्क्यांनी वाढला आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत एसजेव्हीएन कंपनी शेअर २३ टक्क्यांनी वाढला आहे.

कॉन्ट्रॅक्टचा तपशील

एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने माहिती दिली आहे की’ ‘कंपनीने राजस्थान सरकारच्या ऊर्जा विभागाबरोबर राज्यात अक्षय ऊर्जेच्या विकासास प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार, एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी राजस्थानमध्ये 5 गिगावॅट पंप्ड स्टोरेज प्रकल्प आणि 2 गिगावॅट फ्लोटिंग सोलर प्रकल्प विकसित करेल.

कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल

दुसऱ्या तिमाहीत एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला 439.90 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला ४३९.६४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने सांगितले की, दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 1,108.43 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 951.62 कोटी रुपये होते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SJVN Share Price 25 November 2024 Marathi News.