 
						Post Office Scheme | भारतातील नागरिकांसाठी गुंतवणुकीकरिता अनेक पर्याय समोर आहेत. ज्यामध्ये स्टॉक मार्केट सध्या प्रचंड ट्रेंडिंग आहे. बरीच तरुण मंडळी देखील स्टॉक मार्केट आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना पाहायला मिळतात.
प्रत्येक व्यक्ती 0% जोखीम आणि 100% परताव्याची हमी देणारी योजना शोधत असतो. तुम्ही सुद्धा अशाच एका योजनेच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या KVP म्हणजेच ‘किसान विकास पत्र’ या योजनेविषयी माहिती सांगणार आहोत. जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती.
पैसे डबल होणार :
पोस्टाच्या किसान विकास पत्र या योजनेमध्ये तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता. दरम्यान योजनेचा मॅच्युरिटी पिरियड 9 वर्षांचा दिला गेला आहे. ही योजना तुम्हाला वार्षिक आधारावर 7.5% व्याजदर प्रदान करते. तुम्ही सातत्याने गुंतवलेले पैसे मॅच्युरिटीनंतर तुम्हाला दुप्पटीने परत मिळतात.
तुम्ही या योजनेमध्ये 1 लाख रुपये किंवा 1 करोड रुपये गुंतवले तरीसुद्धा चालेल. तुम्ही गुंतवलेले पैसे 115 महिन्यानंतर पुरेपूर सुरक्षित आणि गॅरंटीसह परत मिळतात. 115 महिने म्हणजेच एकूण 9 वर्ष आणि 7 महिने होय.
खात्यात कमीत कमी किती रक्कम जमा करू शकता :
तुम्ही पोस्टाच्या किसान विकास पत्र योजनेत 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. दरम्यान योजनेने जास्तीत जास्त पैसे गुंतवण्याची कोणतीही लिमिट दिली नाहीये. म्हणजेच तुम्ही 1000 ते तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता. केंद्र सरकारकडून वेळेनुसार आणि गरजेनुसार या योजनेवर थोड्याफार प्रमाणात बदल केले जातात. या बदलांची तुम्हाला पूर्तता असली पाहिजे.
प्रीमॅच्युअरची देखील सुविधा :
समजा एखाद्या व्यक्तीला पोस्टाचं किसान विकास पत्र खातं मॅच्युअर होण्याआधीच बंद करायचं असेल तर, खातं उघडण्याच्या तारखेपासून पूर्ण 2 वर्ष आणि 6 महिन्यानंतर खातं बंद करता येणार आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला पोस्टामध्ये किसान विकास पत्र या योजनेसाठी खातं उघडायचं असेल तर, सर्वप्रथम तुम्हाला बचत खातं उघडावं लागेल. त्यानंतर तुम्ही गुंतवणूक करू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		