
Aadhaar Card | आधार कार्ड हे एक अतक कागदपत्र आहे जे शाळेच्या शिक्षणापासून ते ऑफिसमधील कामकाजांसाठी महत्त्वाचे असते. त्याचबरोबर बँकांच्या आणि शासकीय सर्वच कामांसाठी आधार कार्ड फारच महत्त्वाचे असते. नियमाप्रमाणे प्रत्येक 10 वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करायचे असते. अपडेट न केल्यामुळे तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
बहुतांश व्यक्तींच्या आधार कार्डवर चुकीचे नाव किंवा चुकीचा पत्ता असल्याची अडचण पाहायला मिळते. बऱ्याच व्यक्तींना आधार कार्ड अपडेट करताना झालेली चूक कशी दुरुस्त करायची याबद्दल माहिती नसते. तुम्ही एक अतिशय सोपी पद्धत वापरून तुमचा आधार कार्ड अचूक पद्धतीने तयार करू शकता. तुमचे आधार कार्ड भारतीय ओळख प्राधिकरण विभाग तयार करते.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काय करावे :
भारतीय ओळख प्राधिकरण विभागाकडून तुमचे आधार कार्ड तयार केले जाते. त्यामुळे तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरून आधार कार्डमध्ये चुकलेले नाव दुरुस्त करू शकता. आपल्याला प्रत्येक कामकाजासाठी आधार कार्ड लागते त्यामुळे ते अचूक पद्धतीने दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे. तुमचे आधार कार्ड केवळ एकच कागदपत्र दुरुस्त करून घेऊ शकते.
पुढीलपैकी कोणत्याही कागदपत्राच्या मदतीने तुम्ही आधार कार्डवरील नाव बदलू शकता :
1. जन आधार कार्ड
2. दिव्यांग प्रमाणपत्र
3. पासपोर्ट
4. रेशन कार्ड
5. पॅन कार्ड
6. मतदान प्रमाणपत्र
7. ड्रायव्हिंग लायसन्स
8. ईपीएफओ ओळखपत्र
9. बँक पासबुक
10. शाळेमधील लिविंग सर्टिफिकेट
11. विमा योजनेचे प्रमाणपत्र
यांपैकी कोणत्याही एका कागदपत्रावरून तुम्ही तुमच्या आधार कार्ड वरील चुकीचे नाव बदलून घेऊ शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.