20 May 2024 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा
x

IRFC Vs Titagarh Rail Share | सुसाट वेगात रेल्वे संबंधित शेअर्स! IRFC आणि टिटागड रेल सिस्टम्स श्रीमंत बनवत आहेत

IRFC Vs Titagarh Rail Share

IRFC Vs Titagarh Rail Share | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजार अस्थिर असताना टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.58 टक्क्यांच्या वाढीसह 799 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. टिटागढ रेल सिस्टम्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10,160 कोटी रुपये आहे. टिटागड रेल सिस्टीम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 867 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 433 रुपये होती.

मागील 5 दिवसांत या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढले आहेत. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 71 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी टिटागढ रेल सिस्टम्स स्टॉक 0.057 टक्के घसरणीसह 791.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टीटागढ रेल सिस्टीम्स कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 27,890 कोटी रुपये आहे. मागील काही दिवसांपासून परकीय गुंतवणूकदारांनी टिटागड रेल सिस्टीम कंपनीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. या कंपनीने टिटागड, बॅरकपूर येथे आपले दुसरे स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट निर्माण केले आहे. टिटागढ रेल सिस्टम्स कंपनी या प्रोजेक्टमध्ये भारतीय नौदलासोबत काम करत आहे.

भारतीय नौदलाने टिटागड कंपनी शिपयार्डमधून दुसरे डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट लाँच केले आहे ज्यात कॅटामरन प्रकार स्वदेशी डायव्हिंग उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यात कमांड क्लिअरन्स, डायव्हिंग टीम इत्यादी सुविधा असणार आहेत. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत मेक इन इंडिया धोरणाचा फायदा घेण्यासाठी टिटागड रेल्वे कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

2023 या वर्षात जून 2023 मध्ये टिटागढ रेल सिस्टम्स कंपनीने BHEL आणि RKFL या सरकारी कंपन्या सोबत दोन स्वतंत्र करार केले आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि टिटागढ वॅगन्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी 2019 पर्यंत 80 वंदे भारत स्लीपर ट्रेन्स बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट केला आहे.

टिटागढ रेल सिस्टम्स कंपनीला पुढील 35 वर्षासाठी वंदे भारत ट्रेन्सचे देखरेख करण्याचे काम देण्यात आले आहे. भारतीय रेल्वेने एवढे मोठे कंत्राट एखाद्या भारतीय कंपनीला देण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि टिटागड वॅगन यांनी सुरू केलेल्या या संयुक्त उपक्रम अंतर्गत वंदे भारत ट्रेनचे संपूर्ण डिझाइन आणि उत्पादन केले जाणार आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 24000 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs Titagarh Rail Share NSE 07 November 2023.

हॅशटॅग्स

IRFC Vs Titagarh Rail Share(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x