
NHPC Vs NTPC Share Price | एलारा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने पॉवर सेक्टर शेअर्सबाबत महत्वाचे सकारात्मक संकेत दिले आहेत. हायड्रो पॉवर सेक्टरच्या बाबतीत उत्पादनात सलग तिसऱ्या महिन्यात दुहेरी आकडी वाढ पाहायला मिळाली असून ती वार्षिक आधारावर ३१ टक्क्यांनी वाढून ९.४ बीयू झाली आहे.
एलारा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने काय म्हटले?
एलारा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या मते हायड्रो प्लँट्ससाठी प्लांट लोड फॅक्टर वाढून २५ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी अवघा दोन टक्के इतका होता. तसेच नोव्हेंबर २०२४ मध्ये कोळशावर आधारित उत्पादन १०३ बीयूवर स्थिर आहे, तर पीएलएफ मागील वर्षीच्या तुलनेत ६६.५ टक्क्यांवरून किंचित घसरून ६६.० टक्क्यांवर पोहोचले आहे.
अणुऊर्जा निर्मितीची आकडेवारी
एलारा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने पुढे म्हटले आहे की, ‘अणुऊर्जा निर्मितीची आकडेवारी वार्षिक आधारावर ९ टक्क्यांनी वाढून ४.७ बीयूवर पोहोचली आहे, तर वाढत्या हायड्रो उत्पादनामुळे ऑगस्ट २०२४ पासून घटत असलेली गॅस-आधारित निर्मिती नोव्हेंबरमध्ये वार्षिक १४ टक्क्यांनी घटून १.४ बीयू वर पोहोचली आहे. तसेच, नवीकरणीय ऊर्जा निर्मितीत वार्षिक १८ टक्क्यांनी वाढ होऊन ती आकडेवारी १५ बीयू इतकी झाली आहे.
एलारा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – शेअर्स टार्गेट प्राईस
एलारा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने आपल्या कव्हरेज शेअर्समध्ये एनटीपीसी शेअरसाठी 497 रुपये टार्गेट प्राईस, पॉवर ग्रिड शेअरसाठी 384 रुपये रुपये टार्गेट प्राईस, कोल इंडिया शेअरसाठी 572 रुपये रुपये टार्गेट प्राईस, टाटा पॉवर शेअरसाठी 518 रुपये रुपये टार्गेट प्राईस, एनएचपीसी शेअरसाठी 118 रुपये रुपये टार्गेट प्राईस आणि एसजेव्हीएन शेअरसाठी 137 रुपये रुपये टार्गेट प्राईस देताना सोबत ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.