
TTML Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी टाटा ग्रुपच्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी टीटीएमएल शेअर 6.38 टक्के वाढून 86 रुपयांवर पोहोचला होता. गुरुवारी कंपनीचा शेअर इंट्राडे मध्ये 10 टक्क्यांनी वधारून 88.88 रुपयांवर पोहोचला. (टीटीएमएल कंपनी अंश)
टीटीएमएल कंपनी तपशील काय आहेत?
टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये गेल्या ५ दिवसांत ८ टक्के आणि महिनाभरात 23 टक्के वाढ झाली आहे. लॉन्ग टर्ममध्ये टीटीएमएल कंपनी शेअर्सने जवळपास ३५०० टक्के परतावा दिला आहे.मागील ५ वर्षांत टीटीएमएल शेअर्स २ रुपयांवरून 86 रुपयांवर पोहोचला आहे. जानेवारी 2022 मध्ये टीटीएमएल कंपनीचे शेअर 290 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. टीटीएमएल लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 111.40 रुपये होता आणि 52 आठवड्यांची नीचांकी स्तर 65.05 रुपये होता. सध्या टीटीएमएल कंपनीचे एकूण मार्केट कॅप 16,703 कोटी रुपये आहे.
टीटीएमएल लिमिटेड कंपनी बद्दल
टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी ही टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेडची उपकंपनी आहे. टीटीएमएल लिमिटेड कंपनीच्या सेवांमध्ये क्लाऊड आणि एसएएएस, डेटा सेवा, सहकार्य, सायबर सुरक्षा, मार्केटप्लेस सोल्यूशन्स आणि व्हॉईस सर्व्हिसेस यांचा समावेश आहे.
टीटीएमएल शेअरने 3410% परतावा दिला
मागील ५ या दिवसात या शेअरने 7.66% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात टीटीएमएल शेअरने 23.69% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 6.23% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टीटीएमएल शेअरने 3,410.20% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये टीटीएमएल शेअरने गुंतवणूकदारांना 1,071.66% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.