27 April 2024 9:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफचे 5 मोठे फायदे, गुंतवणूक करून किती फायदा मिळतो ते एकदा समजून घ्याच

Gold ETF Investment

Gold ETF Investment| सोन्यात गुंतवणूक करणे अनेकदा सुरक्षित मानले जाते. भविष्यातील अस्थिरता आणि अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी किंवा गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी लोक सोन्यात गुंतवणूक करतात. सोन्यात भौतिक स्वरुपात गुंतवणूक करणे हे थोडे कठीण आहे. सोन्यात गुंतवणूक केल्याने त्याची सुरक्षितता आणि साठवणुक या दोन्ही गोष्टींना तोंड देणे अवघड जाऊ शकते. त्यामुळे गोल्ड ईटीएफ म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये गुंतवणूक करणे अधिक सोयीस्कर आहे. चला तर मग जाणून घेऊ गोल्ड ईटीएफ बद्दल सविस्तर

गोल्ड ईटीएफ म्हणजे काय?
Gold ETF म्हणजे प्रत्यक्ष सोन्याची डिजिटल स्वरूपात खरेदी आणि साठवण करणे, जे डीमॅटद्वारे खरेदी किंवा विरकी केले जातात. Gold ETF देशांतर्गत प्रत्यक्ष सोन्याच्या किमतीला फॉलो करते. शेअर मार्केटमधील कंपनीच्या स्टॉकप्रमाणे NSE आणि BSE वर Gold ETF ही सूचीबद्ध होतात. जेव्हा तुम्ही गोल्ड ईटीएफमध्ये पैसे लावता, तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष सोने दिले जात नाही, परंतु तुम्ही सोन्याच्या किमतीएवढे डिजिटल गोल्ड तुमच्या डिमॅट खात्यात जमा होते. त्याचप्रमाणे, जेव्हा तुम्ही Gold ETF विकता तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष सोने विकत नाही, तर सोन्याच्या किमतीच्या समतुल्य राखीव असलेली रोख रक्कम विकता.

गोल्ड ईटीएफची खरेदी आणि विक्री कशी करावी?
तुम्ही आपल्या डीमॅट खात्यातून BSE किंवा NSE वर सूचीबद्ध असलेले गोल्ड ETF खरेदी किंवा विक्री करू शकता. या मध्ये तुम्ही किमान एक युनिट इतके मूल्य असलेले सोने खरेदी किंवा विक्री करू शकता. जर तुमच्याकडे डीमॅट खाते नसेल तर तुम्ही Gold FOF वापरून गोल्ड ईटीएफमध्ये सहज गुंतवणूक करू शकतात. गोल्ड FOF द्वारे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे सोपे जाते. Gold ETF मध्ये गुंतवणूकदार SIP द्वारे किंवा एकरकमी रक्कम जमा करून Gold ETF मध्ये गुंतवणूक करू शकतात.

गोल्ड ईटीएफ खरेदी करण्याचे फायदे :
1) गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला सोन्याच्या सुरक्षिततेची आणि साठवणुकीची काळजी करण्याची गरज नाही. सोन्याच्या देखभालीसाठी कोणत्याही अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. आणि सोन्याच्या चोरीचीही भीती नाही.
2) गोल्ड ईटीएफ युनिट डिजिटल स्वरूपात असल्याने, ते ठेवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लॉकरची गरज नाही. ETF मध्ये गुंतवणूक केल्याने ते तुमच्या डिमॅट खात्यात डिजिटल स्वरूपात साठवले जातात.
3) Gold ETF हे नियमन केलेले घटक आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याच्या शुद्धतेची काळजी करण्याची गरज नाही. ETF मध्ये सोन्याची शुद्धता पातळी कायम 99.5 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ठेवली जाते. Gold ETF युनिट्स खरेदी करताना तुम्हाला कोणतेही प्रीमियम किंवा मेकिंग चार्ज द्यावा लागत नाही.
4) Gold ETF खरेदी विक्री व्यवहार करताना सोन्याच्या किंमतीमध्ये पूर्ण पारदर्शकता राखली जाते.
5) सोन्याच्या देखभालीचा खर्च फार कमी असतो. दागिने खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना ठराविक रक्कम द्यावी लागते. परंतु गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफमध्ये किमान 45 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात. आणि त्यात कमाल मर्यादा नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Gold ETF Investment opportunities and return on investment with guide for buying and selling of Gold ETF on 27 October 2022.

हॅशटॅग्स

#Gold ETF Investment(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x