2 May 2024 6:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

मी त्या महिलेचा हात पकडलाच नव्हता; असं वागणं ही सेनेची संस्कृती नाही: महापौर

Mumbai Mayor, Mayor Vishweshwar Mahadeshwar, Shivsena

मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे सोमवारी त्यांच्याच मतदारसंघातील महिलेशी असभ्य वागले. त्यांच्या पदाला हे शोभण्यासारखं नसून ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. यापूर्वी देखील त्यांनी मुंबईतील अनेक गंभीर घटनांवर अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक प्रतिक्रिया दिल्याचा इतिहास आहे. डोळ्यासमोर दिसणाऱ्या गोष्टींवर देखील ते धादांतपणे खोटं बोलताना मुंबईकरांनी अनुभवलं आहे. काही दिवसांपूर्वी अनेक भागात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबलेले असताना देखील त्यांनी ऑन कॅमेरा ते अमान्य करत प्रसार माध्यमांनाच चुकीचं म्हटलं होतं. मुंबईतील शहरामध्ये घडलेल्या अशा अनेक घटनांवेळी त्यांनी संतापजनक वक्तव्य केली आहेत. त्यात शिवसेनेकडून देखील त्यांच्या गैरवर्तनावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि त्यांना कोणतीही समज देखील देण्यात आलेली नाही.

मागील तीन दिवस मुंबईत प्रचंड पाऊस पडतोय. प्रशासनाचा हलगर्जीपणाचं पितळ उघडं पडलंय. याबद्दल जाब विचारणाऱ्या महिलेचा हात मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर पिरगळताना दिसत आहेत. मुसळधार पावसामुळे सांताक्रूजमधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. यामध्ये ४५ वर्षीय महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या२६ मुलाचाही शॉक लागून मृत्यू झाला.

या घटनेनंतरही स्थानिक नगरसेवकांनी भेट दिली नाही. याचा स्थानिकांमध्ये रोष होता. बुधवारी महापौर जेव्हा भेट द्यायला आले, तेव्हा स्थानिक महिलांनी त्यांना घेराव घातला. त्यावेळी महापौरांनी एका महिलेचा हात पिळला होता. खुद्द महापौरांनीच महिलेचा विनयभंग केल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. सांताक्रुज मध्ये महापौरांनी एका महिलेचा हात मुरगळल्याचा विडिओ व्हायरल झाल्यानंतर महापौरांनी मात्र त्याच स्पष्टीकरण दिलय. व्हिडिओ मध्ये महापौरांनी हात पिळल्याच दिसत असतानाही मी हात पकडला नव्हता, असं महाडेश्वर यांनी म्हटलंय.

मी शिक्षक आहे मला महिलेशी कस वागायचं हे समजतं. अशा पद्धतीने वागणं ही शिवसेनेची संस्कृती नसल्याचं महापौरांनी म्हटलंय. हे मनसेच्या कार्यकर्त्यांनी राजकारण केलं असल्याचं महापौरांनी म्हटलंय.दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी महापौरांना पत्र लिहिलं असून राजीनामा देण्याची मागणी केली आहे. शालिनी ठाकरे यांनी फेसबुकवर हे पत्र शेअर केलं आहे. जनाची नाही तर मनाची लाज बाळगून ‘महापौरपदाचा राजीनामा’ देण्याबाबत थेट पत्र लिहिलं आहे.

दरम्यान, महापौरावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे. महिलांचा आदर करण्याचे साधे तारतम्यही शिवसेनेच्या या महापौराकडे नाही, समस्या ऐकून घेण्याची सहनशिलता नाही अशा महापौरावर कारवाई करण्याची गरज आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बेजबाबदार व उद्धट महापौरावर आता काय कारवाई करतात हेही पाहावे लागेल, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

तर मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी देखील महापौरांवर टीका करत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x