 
						TATA Group IPO | आयपीओ गुंतवणूकदारांसाठी २०२४ हे वर्ष खूप फायद्याचं ठरलं आहे. २०२४ या वर्षात अनेक कंपन्यांच्या आयपीओ मार्फत गुंतवणूकदारांनी मोठी कमाई केली आहे. आता २०२५ मध्ये अजून काही कंपन्या आयपीओ मार्फत शेअर बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यात टाटा ग्रुपच्या एका कंपनीचा सुद्धा समावेश असण्याचं वृत्त आहे.
टाटा ग्रुप कंपनी नवीन वर्षात आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत
टाटा कॅपिटल लिमिटेड कंपनीचा आयपीओ नवीन वर्षात लाँच होण्याचे संकेत मीडिया रिपोर्टने दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या बंपर लिस्टिंगनंतर एक वर्षाहून अधिक कालावधी उलटल्यावर टाटा कॅपिटल लिमिटेड कंपनी आता नवीन वर्षात आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना एक संधी संधी प्राप्त होणार आहे.
टाटा सन्सची उपकंपनी – टाटा कॅपिटल लिमिटेड कंपनी आयपीओ
टाटा ग्रुपची प्रमुख वित्तीय सेवा युनिट असलेल्या टाटा कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या आयपीओची तयारी सुरू झाली आहे. या प्रोसेसमध्ये व्यस्त असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली आहे. टाटा कॅपिटल लिमिटेड कंपनी ही नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस (एनबीएफसी) कंपनी आहे. टाटा कॅपिटल लिमिटेड ही कंपनी टाटा सन्सची उपकंपनी आहे.
तपशील काय आहेत?
मनीकंट्रोलने दिलेल्या रिपोर्टनुसार, ‘एन. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखालील टाटा कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या आयपीओवर काम सुरू झाले आहे. मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा कॅपिटल लिमिटेड कंपनीचा हा मेगा आयपीओ 15,000 कोटी रुपयांचा असू शकतो. टाटा कॅपिटल लिमिटेड कंपनीकडून लॉ फर्म सिरिल अमरचंद मंगलदास आणि इन्व्हेस्टमेंट बँक कोटक महिंद्रा कॅपिटल यांची या आयपीओसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती मीडिया रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परिपत्रक
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका परिपत्रकात म्हटले होते की, ‘अप्पर लेयर एनबीएफसीला 3 वर्षांच्या आत स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करणे बंधनकारक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर 2022 मध्ये हे परिपत्रक जारी केले होते. टाटा कॅपिटल लिमिटेड कंपनीसाठी ही ३ वर्षांची मुदत सप्टेंबर २०२५ मध्ये संपत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		