
Waaree Energies Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात जोरदार तेजी झाल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारी ट्रेडिंगच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स 1,436.30 अंकांनी म्हणजेच 1.83 टक्क्यांनी वाढून 79,943.71 वर बंद झाला होता. तर स्टॉक मार्केट एनएसईचा 50 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी देखील 445.75 अंकांनी वाढून 24,188.65 अंकांवर बंद झाला होता. या तेजीत वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीबाबत एक फायद्याची अपडेट समोर आली आहे.
वारी एनर्जीज कंपनी शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी वारी एनर्जीज शेअर 1.02 टक्क्यांनी घसरून 2,833 रुपयांवर पोहोचला होता. वारी एनर्जीज कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 3,743 रुपये होती, तर वारी एनर्जीज कंपनी शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 2,300 रुपये होती. वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 81,574 कोटी रुपये आहे.
वारी एनर्जीज कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीला १५० मेगावॅट सौर मॉड्यूल पुरवठ्याचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये वारी एनर्जीज कंपनीच्या उच्च-कार्यक्षमतेच्या ग्लास एन-टाइप टॉपकॉन बायफेशियल मॉड्यूलचा पुरवठा देखील सामील आहे. या मॉड्यूल रेटिंग 585/590 डब्ल्यूपी असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. हे मॉड्यूल टिकाऊपणा, अपवादात्मक ऊर्जा निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये वारी एनर्जीज कंपनीला या मॉड्यूलचा पुरवठा करावा लागणार आहे. वारी एनर्जीज कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत माहिती दिली आहे.
वारी एनर्जीज शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात वारी एनर्जीज कंपनी शेअर 0.57% घसरला आहे. मागील १ महिन्यात वारी एनर्जीज शेअरने 3.38% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 21.13% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात वारी एनर्जीज शेअरने 21.13% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर वारी एनर्जीज शेअर 1.93% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.