 
						Bonus Share News | जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनीने फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना ४:१ या प्रमाणात बोनस शेअर देण्याची निर्णय घेतला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना प्रत्येक 1 शेअरमागे 4 बोनस शेअर्स मिळतील. बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी जिंदाल वर्ल्डवाइड शेअर 1.12 टक्क्यांनी वाढून 450 रुपयांवर पोहोचला होता.
जिंदाल वर्ल्डवाइड शेअरने ५ वर्षांत ६५० टक्के परतावा दिला
जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनी शेअरने गेल्या ५ वर्षांत ६५० टक्के परतावा दिला आहे. १० जानेवारी २०२० रोजी जिंदाल वर्ल्डवाइड कंपनीचा शेअर ६२.७० रुपयांवर ट्रेड करत होता. गेल्या 4 वर्षात जिंदाल वर्ल्डवाइड कंपनी शेअरने 690 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत जिंदाल वर्ल्डवाइड कंपनीचे शेअर्स ५८ रुपयांवरून ४७० रुपयांपर्यंत वाढला आहे. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 471.20 रुपये होता, तर निच्चांकी स्तर 267.75 रुपये होता. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 8,983 कोटी रुपये आहे.
जिंदाल वर्ल्डवाइड शेअरने १० वर्षांत ४०००टक्के परतावा दिला
जिंदाल वर्ल्डवाइड कंपनी शेअरने मागील १० वर्षांत ४००० टक्के परतावा दिला आहे. ८ जानेवारी २०१५ रोजी जिंदाल वर्ल्डवाइड कंपनीचा शेअर ११.१४ रुपयांवर ट्रेड करत होता. गेल्या वर्षभरात जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनी शेअरने ५० टक्के परतावा दिला आहे. तसेच गेल्यास दोन महिन्यांत शेअरने ५५ टक्के परतावा दिला आहे.
जिंदाल वर्ल्डवाइड कंपनीबद्दल
जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनी बीसी जिंदाल ग्रुपची कंपनी आहे. पश्चिम बंगालमध्ये जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनीचे दोन कारखाने आहेत. जिंदाल वर्ल्डवाइड कंपनी भारतीय बाजारपेठे व्यतिरिक्त लॅटिन अमेरिका आणि इतर अनेक देशांना पोलाद उत्पादनांची निर्यात करतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		