IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL – NSE: IRFC

IRFC Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळाली होती. मागील अनेक दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. या घसरणीतही शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत जे तेजीत आहेत.

दरम्यान, ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर मार्केट तज्ज्ञांनी आयआरएफसी शेअर्स गुंतवणुकीबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. चला तर जाणून घेऊया आयआरएफसी शेअर्सबाबत स्टॉक मार्केट विश्लेषकांनी कोणता सल्ला दिला आहे.

आयआरएफसी शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला

आयआरएफसी शेअर्सचा विचार केला हा शेअर सातत्याने घसरणीत असल्याचे तज्ज्ञांचे म्हटले आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 40.48 टक्क्यांनी घसरला आहे. तज्ज्ञांच्या मते, लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून आयआरएफसी शेअरला १३०-१३२ रुपयांच्या आसपास सपोर्ट आहे.

ज्या गुंतवणूकदारांकडे आयआरएफसी कंपनी शेअर्स आहेत ते १३० रुपयांच्या आसपास अजून शेअर्स खरेदी करू शकतात. लॉन्ग टर्ममध्ये गुंतवणूकदारांसाठी आयआरएफसी शेअर फायद्याचा ठरू शकतो.

आयआरएफसी शेअरने १३० रुपयांच्या पातळीवरून खाली घसरल्यास पुढे तो ११६ रुपयांपर्यंत घसरू शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे दीर्घ मुदतीसाठी १३० रुपये या पातळीवर अधिक शेअर्स खरेदी करावेत असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

आयआरएफसी शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर 5.12 टक्क्यांनी घसरून 128.76 रुपयांवर पोहोचला होता. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनर लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 229 रुपये होता, तर आयआरएफसी शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 104.25 रुपये होता. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,67,864 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price Monday 13 January 2025 Marathi News.